१. धार्मिक उत्सव
अ. संस्थानच्या वतीने बाबांची पुण्यतिथी, जयंती, गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या स्वरुपात साजरे केले जातात.
आ. पुण्यतिथी आणि जयंती या दोन्ही उत्सवांच्या दिवशी सर्व भक्तांच्या कल्याणार्थ धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. या दिवशी प्रतीदिन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सामुहिक जप केला जातो. बाबांची भव्य पालखी मिरवणूक कणकवली शहरातून काढली जाते.
२. महाप्रसाद
अ. वर्ष २००४ पासून संस्थानच्या वतीने प्रत्येक गुरुवारी विनामूल्य महाप्रसादाची सोय केली जात आहे.
आ. बाहेरून येणार्या भक्तांसाठी संस्थांनच्या वतीने प्रतिदिन १० रुपये नाममात्र घेऊन महाप्रसादाची सोय केली जाते. प्रत्येक गुरुवारी होणार्या महाप्रसादाचा खर्च एकावेळी एकच भक्त करतो. (कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून प्रती गुरुवारचा महाप्रसाद शासनाच्या आदेशानुसार बंद आहे.)
३. भक्तनिवास
अ. भक्तांसाठी संस्थानचे १६ खोल्यांचे सुसज्ज भक्त निवास आहे. तसेच सदर भक्तनिवासाच्या बाजूला ‘काशीभूवन’ या नावाने नवीन भक्तनिवास बांधण्यात आले असून त्यामध्ये १५ निवासी खोल्यांची सोय उपलब्ध आहे.
४. वैद्यकीय सेवा
वर्ष २००६ पासून विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध केली असून त्यासाठी एक डॉक्टर आणि एक साहाय्यक नियुक्त केले आहेत. प्रतिवर्षी जयंती उत्सवाच्या वेळी रक्तदान शिबिर आयोजित करून गरजूंना त्याचा लाभ दिला जातो.
५. शैक्षणिक सेवा
इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा, तसेच जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्ग संस्थानच्या वतीने आयोजित केले जातात. या शिष्यवृत्ती सराव परिक्षेत जे विद्यार्थी पहिल्या १० क्रमांकात येतात तेच विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या १० मध्ये असतात. याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.
६. ४३ वा पुण्यतिथी महोत्सव वर्ष २०२०
चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाबांचा पुण्यतिथी महोत्सव अत्यंत साधेपणाने; परंतु प्रतिवर्षीप्रमाणे सर्व धार्मिक विधींचे आयोजन करून साजरा होणार आहे.