(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

  • अशी विधाने करणार्‍या पाद्रयावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
  • मोदीद्वेष आणि त्याहून अधिक हिंदुद्वेष यांमुळे अतिशय खालच्या स्तराला जाऊन पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीवर गरळओक करणारे पाद्री म्हणजे प्रेम आणि शांती यांचे पुजारी ! सरगुनम यांनी मोदी देश चालवण्यास किती प्रमाणात समर्थ आहेत, याविषयी भाष्य करण्याऐवजी अनाचाराचे आणि भ्रष्ट कारभाराचे अड्डे बनलेल्या चर्चच्या काराभारकडे लक्ष दिले, तर निदान ख्रिस्ती समाजाचे तरी भले होईल !
डावीकडून ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

चेन्नई (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावर शासन करण्यास असमर्थ आहेत; कारण ते त्यांच्या पत्नीसह ५ दिवसही राहिले नव्हते, अशी अश्‍लाघ्य टीका तमिळनाडूतील बिशप आणि द्रमुकचे समर्थक असलेले एजरा सरगुनम यांनी केली. द्रमुकचे प्रमुख एम्.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कृषी कायद्याच्या विरोधातील उपोषणामध्ये बिशप एजरा यांनी भाग घेतला होता. तेव्हा ते बोलत होते.

१. एजरा पुढे म्हणाले की, मोदी स्वतःचे डोके न पालटणारी व्यक्ती आहे. ती एक अशी व्यक्ती आहे जी देशाला लुटण्यासाठी आली आहे आणि हे काम ती योग्य प्रकारे करत आहे. त्यांचे कर्तव्य ४ श्रीमंतांना समर्थन करण्याचे आहे. ते गरिबांची काळजी करत नाहीत. ते म्हणतात, ‘मी गरीब घरात जन्माला आलो आहे आणि चहा विकला आहे.’ प्रत्यक्षात  मात्र ते गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. मी त्यांना घाबरत नाही; कारण त्यांच्याकडे विवेक नाही. ते त्यांच्या पत्नीसमवेत कमीत कमी ५ दिवस तरी राहिले असते, तर त्यांना जीवनातील कठीण समस्यांची माहिती झाली असती. जोपर्यंत मोदी यांना हटवले जात नाही, तोपर्यंत आपल्याला समस्या येतच रहाणार आहेत. आपल्या सर्वांना हे सर्व नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.

२. बिशप एजरा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली होती. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी म्हटले होते की, हिंदु धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता. हिंदूंच्या कानफटात मारल्यावर रक्त येऊ दे; मग त्यांना ख्रिस्ती धर्माचे वास्तव लक्षात येईल.