५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

दीपावलीनिमित्त कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींना पू. रमानंद गौडा यांनी केले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा वडोदरा (गुजरात) येथील चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडोदरा (गुजरात) येथील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !

ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा !

ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजेेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा ! हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या !   

हिंदूंनो, स्वधर्म जाणून धर्माभिमान जोपासा ! 

धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी अवतारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

विश्‍वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.

धर्माचरणाची अपरिहार्यता अधोरेखित करणार्‍या घटना

धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.

धर्माचरणाविषयी मान्यवरांचे मौलिक विचार

‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्‍हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’

धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’