१० सहस्रांहून अधिक साधकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य ब्रह्मोत्सव !

श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा प्रतिवर्षी साजरा होणारा जन्मोत्सव ही साधकांसाठी अनमोल पर्वणी असते ! प्रतिवर्षी श्रीगुरूंचे जे मनोहारी दर्शन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होते, ते भावदर्शन यंदा प्रत्यक्ष घडणार असल्यामुळे साधक डोळ्यांत प्राण आणून गुरुदेवांची वाट पहात होते !

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांनी नृत्यादी सेवांद्वारे श्रीविष्णुची केली भावपूर्ण आराधना !

रथारूढ महाविष्णूची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! श्रीविष्णुरूपात रथात विराजमान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी कलेच्या माध्यमातून भाव अर्पण केला.

येणार्‍या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे व्यवस्थापन आणि सनातनच्या साधकांनी घडवलेले स्वयंशिस्तीचे दर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला होता. गुरुदेवांचाही असा भव्य जन्मोत्सव साजरा करावा’, अशी सनातनच्या साधकांची मनोमन इच्छा मागील अनेक वर्षांपासून होती, ती या जन्मोत्सवामुळे पूर्णत्वास गेली !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’

सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्ला (सांखळी) येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न !

सांखळी (गोवा) येथील सुर्ला येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न झाली. सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जानेवारी या दिवशी वेदमूर्ती कै. कृष्णामामा केळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता.

दिंड्या, पताका वैष्णव नाचती । श्रीमन्नारायणाचा महिमा वर्णावा किती ।।

श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा दिव्य रथोत्सव !

भक्तीमय वातावरणात पार पडला श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी ‘रथोत्सव’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नृत्य पथक, ध्वजपथक यांद्वारे श्रीविष्णुतत्त्वाचे आवाहन !

लातूर जिल्ह्यातील संजीवनी बेटावरील दुर्मिळ औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर !

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेट दुर्मिळ औषधींसाठी प्रसिद्ध आहे. शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या बेटावरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

जून २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. ट्विटर’, ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘ज्यांच्याकडे आपण आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतो आणि ज्यांच्या साहाय्याने आपण एक सुंदर आध्यात्मिक जीवन जगू शकतो, असे कुणीतरी आहे, यासाठी पुष्कळ धन्यता वाटते. तुम्ही देत असलेल्या उत्तरांसाठी आभारी आहे.’