हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

महिला आणि युवती यांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड – मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे. त्यासाठी त्यांनी स्वरक्षण करण्यासह साधना करून मनोबल वाढवायला हवे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाला हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे आणि युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महिला आणि युवती यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कु. प्रियांका लोणे

या वेळी कु. प्रियांका लोणे यांनी ‘हिंदु महिला आणि युवती यांनी असुरक्षितता दूर करण्यासाठी धर्माचरण, साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण यांची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. याचसमवेत ‘प्रत्येक हिंदु महिला आणि युवती यांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह स्वतःतील आत्मबळ वाढवणे, ही काळाची आवश्यकता आहे’, असेही त्यांनी सांगितले.

श्री. हर्षद खानविलकर

युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी शौर्यजागृती उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. या वेळी ते म्हणाले की, महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून स्वतःची मनगटे घट्ट केली पाहिजेत. धर्मांध आणि दुष्ट नराधमांनी महिलांवर हात टाकण्याचे धाडस केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. यासाठी महिलांनी प्रशिक्षित होऊन स्वतःतील देवीतत्त्व जागृत करून नराधमांना धडा शिकवायला हवा.

विशेष

‘कार्यक्रम खूपच महत्त्वपूर्ण आहे’, असा अभिप्राय देऊन उपस्थितांनी शौर्यजागृती शिबिर आणि शौर्यजागृती वर्ग ‘ऑनलाईन’ घेण्याची मागणी केली.