राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून स्वतःतील शौर्य जागृत करा ! – कु. सरिता मुगळी

कु. सरिता मुगळी

बेंगळुरू – आजची युवा पिढी स्वैराच्या नावाखाली स्वतः गुलामगिरीत अडकत आहे. सध्याची निधर्मी शिक्षणव्यवस्था आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांच्यामुळे अनेक युवती ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रात अडकून देशद्रोही कृत्ये करत आहेत. हे रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूने आपल्या राष्ट्रपुरुषांविषयी, तसेच भारताच्या श्रेष्ठ इतिहासाविषयी माहिती समजून घेणे अत्यावश्यक झाले आहे. ब्रिटिशांच्या विरुद्धच्या लढ्यात स्वतःच्या मुलाला पाठीशी बांधून रणांगणात उतरणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी स्वतःतील शौर्य जागृत करायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. सरिता मुगळी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्नाटकमधील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या शेवटी स्वरक्षण प्रशिक्षणाविषयीची माहिती श्री. अनिल सोलंकर यांनी दिली. या कार्यक्रमाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला.

उपस्थित धर्मप्रेमींचे अभिप्राय

  •  माझ्या परिचयातील सर्व हिंदूंना एकत्र करून त्यांना स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी सांगून शिकवण्याचा प्रयत्न करीन.
  • आपल्या देशातील राष्ट्रपुरुषांविषयीची माहिती प्रत्येक युवक-युवतींपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग ऐकतांना माझ्यातील शौर्य जागृत होत होते. आपण आपल्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत.
  • व्याख्यानातील विषय ऐकतांना शौर्यजागृती झाली. आपणही स्वरक्षण प्रशिक्षण परिपूर्ण शिकले पाहिजे, असे वाटले.