कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्र शिंदे
पू. शिवाजी वटकर

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥ १ ॥

सद्गुरु राजेंद्रदादा आम्हा साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारती ।
तत्त्वनिष्ठ राहूनी ते आमच्या चुका सांगती ॥ २ ॥

सद्गुरु राजेंद्रदादा आध्यात्मिक त्रास दूर करण्या उपाय सांगती ।
आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेऊनी, समष्टीची घडी बसवती ॥ ३ ॥

सद्गुरु राजेंद्रदादा शिस्त आणि प्रीती यांची सांगड घालिती ।
हिंदु राष्ट्र निर्मितीच्या गुरुकार्यात आम्हाला सहभागी करवूनी घेती ॥ ४ ॥

सद्गुरु राजेंद्रदादांच्या ‘गुरुकृपे’च्या ऋणातून कोणी न होई उतराई ।
कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ॥ ५ ॥

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संताच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक