हिंदुद्वेष्ट्या लेखिका अरूंधती रॉय यांनी जर्मन वृत्तवाहिनीवरून भारत शासनावर केलेल्या टिकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण

१७ एप्रिल २०२० या दिवशी ‘ड्यूच व्हेले’ (डीडब्ल्यू) या जर्मन वृत्तवाहिनीने ‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा : मोदी सरकार कोव्हिड-१९ संकटाचा वापर मुसलमानांना कलंकित करण्यासाठी करत आहे’, असे खोटे वृत्त प्रसारित केले. या वेळी काही मुसलमान भाजीविक्रेते ‘हिंदू त्यांच्याकडून भाजी विकत घेत नाहीत’, अशी तक्रार करतांना दाखवण्यात आले. या प्रसंगी वृत्तवाहिनीने भारतातील एका महिला टीकाकाराची मुलाखत दाखवली. त्यामध्ये त्यांनी भारतातील मोदी शासन मुसलमानांच्या विरोधात भेदभाव करत असल्याची टीका केली. काही वेळाने या वृत्तवाहिनीने पूर्वीच्या महिला टीकाकाराची मुलाखत दाखवण्याचे थांबवले आणि हिंदुद्वेष्ट्या लेखिका अरूंधती रॉय यांची मुलाखत प्रसारित करणे चालू केले. ‘भारतातील परिस्थिती नरसंहाराकडे मार्गक्रमण करत आहे; कारण सरकारचा तो अजेंडाच आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून जमावाकडून अल्पसंख्यांकांना ठेचून ठार मारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांना लक्ष्य केले जात आहे, तसेच त्यांना कलंकित करण्याचा कट रचला गेला आहे. यातून मोठ्या हिंसाचाराचा धोका निर्माण झाला आहे’, असे वक्तव्य रॉय यांनी या मुलाखतीत केले. प्रस्तुत लेखात हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी या टीकेचे खंडण केले आहे. हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

मारिया वर्थ

‘ड्यूच व्हेले’ या जर्मन वृत्तवाहिनीकडून एकांगी वृत्ताचे प्रसारण

भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये तसे मित्रत्वाचे संबंध आहेत. असे असतांना ‘ड्यूच व्हेले’ (डीडब्ल्यू) ही जर्मन वृत्तवाहिनी भारताच्या विरोधात वृत्त प्रसारित करते, हे पाहून मला थोडे आश्‍चर्य वाटले. बर्‍याच वेळा मी ‘ड्यूच व्हेले’ (डीडब्ल्यू) ही वृत्तवाहिनी पहाते. आपली विचारसरणी कशी हवी ? याविषयी त्यांचे मत जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. जर्मनीतील बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्या सरकारची बाजू उचलून धरतांना दिसतात; परंतु भारतातील स्थिती याच्या बरोबर उलट आहे. भारतातील बर्‍याच वृत्तवाहिन्या शासनाच्या विरोधात भूमिका मांडतांना दिसतात. भारतात मुसलमान भाजीविक्रेत्यांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्याचे ‘व्हिडिओ’ या वृत्तवाहिनीवरून दाखवण्यात आले; मात्र आताच भारतात असे का घडते आहे ? हे दाखवण्याची तसदी या वृत्तवाहिनीने घेतलेली दिसत नाही. ‘अल्लाने कोरोना विषाणू हिंदूंना ठार मारण्यासाठी पाठवला आहे. त्यामुळे तो सर्वत्र पसरवा’, असे मौलवी सांगतात; मात्र त्याविषयीचे वृत्त या वाहिनीवरून प्रसारित केले जात नाही.

कोरोनाच्या काळात धर्मांधांची हीन वर्तणूक

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे दळणवळण बंदी घोषित केली असतांना देहलीत  इस्लाम धर्मप्रचारकांचे शिबिर भरवण्यात आले. यामध्ये सहभागी झालेले धर्मप्रचारक देशातील विविध भागांत गेले आणि त्या भागांत त्यांनी कोरोना पसरवला. तोपर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या केवळ ८०० एवढीच होती. या सहस्रावधी धर्मप्रचारकांपैकी बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची चाचणी करण्यासाठी गेलेले डॉक्टर आणि पोलीस यांच्यावर त्यांनी दगडफेक केली. यामध्ये अनेक जण घायाळ झाले. यांमधील काही धर्मप्रचारकांची रुग्णालयातील वागणूक पुष्कळ भयानक होती. डॉक्टरांवर थुंकणे, रुग्णालयात उघड्यावर मलमूत्र करणे, अश्‍लील हावभाव करणे, महिला परिचारिकांसमोर नग्न फिरणे आदी प्रकार या धर्मप्रचारकांकडून झाले.

धर्मांधांची कोरोनाविषयीची भयंकर हिंदुद्वेषी मानसिकता

इस्लाम धर्मप्रचारक असे का वागले ? कारण त्यांच्या धर्मग्रंथातील शिकवणीने ते प्रभावित झाले असल्याने त्यांच्याकडून असे प्रकार घडले. ‘संपूर्ण विश्‍व जोपर्यंत अल्लाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायचा आहे’, हे त्यांना ठाऊक आहे. ‘सर्वच काफिरांना नष्ट करणे तेवढे सोपे नाही. त्यामुळेच अल्लाने कोरोना विषाणूची देण दिली आहे. त्याचा प्रसार केल्यास हे काम सोपे होईल’, असे या धर्मप्रचारकांना वाटते. त्यामुळे त्यांना हा विषाणू पसरवायचा आहे. कोरोना चाचणीला त्यांनी कसा विरोध केला ?, संचारबंदीचे उल्लंघन कसे केले ?, भाजी आणि चलनी नोटा यांवर ते कसे थुंकत होते ? आदींविषयीचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये पोलीस रस्त्यावर टाकलेल्या चलनी नोटा काठीने उचलून त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकत असल्याचे दाखवण्यात आले. चलनी नोटा रस्त्यावर फेकण्यामागे या लोकांचा कपटीपणा दडलेला होता. पैशाचा मोह लहान मुलांना किंवा गरिबांना ते उचलण्यास भाग पाडेल आणि ते कोरोनाचे बळी ठरतील. ‘हिंदू मृत्यूमुखी पडावेत’, असे या मुसलमान भाजीविक्रेत्यांनाही वाटत नसेल कशावरून ? या भीतीपोटी काही ठिकाणी हिंदूंनी त्यांच्याकडून भाजी घेण्याचे टाळले, तर त्याविषयी सध्याच्या घडीला आश्‍चर्य करण्यासारखे काहीच नाही. ‘काफिरांना फसवा’, असा त्यांना आदेशच आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवणे अशक्य आहे. नंतर पश्‍चात्ताप करण्यापेक्षा स्वत:ला सुरक्षित ठेवणे नेहमीच चांगले, या न्यायाने ते तसे वागले, तर त्यात अयोग्य काहीच नाही; परंतु याविषयी त्या वृत्तवाहिनीवर काहीच दाखवण्यात आले नाही.

महिला टीकाकाराची मोदी शासनावर टीका – अल्पसंख्यांकांच्या विरोधात भेदभावाचा आरोप

या वृत्तवाहिनीने शेवटी भारतातील एका महिला टीकाकाराची मुलाखत दाखवली. त्यामध्ये त्यांनी मोदी शासन मुसलमानांच्या विरोधात भेदभाव करत असल्याची टीका केली. हा खोटारडेपणा होता. मोदी शासनाकडून देशात सर्वत्र चालू असलेल्या साहाय्यकार्यात धार्मिक गटांच्या आधारावर कुठलाच भेदभाव केलेला नाही. भारताविषयी हे चुकीचे वृत्तांकन पाहून मला पुष्कळ त्रास झाला. ‘डीडब्ल्यू’ या वृत्तवाहिनीने पाकिस्तानमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात होणार्‍या भेदभावाविषयी कधी वृत्त प्रसिद्ध केल्याचे ऐकिवात नाही. पाकिस्तानमध्ये कोरोना संकटाच्या वेळी हिंदूंना शिधा वाटपही केले जात नव्हते, तसेच जिवंत रहाण्यासाठी त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते; परंतु ‘डीडब्ल्यू’ने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. यावरून ‘डीडब्ल्यू’चा भारताच्या विरोधातील कल माझ्या लक्षात आला.

‘डीडब्ल्यू’कडून हिंदुद्वेष्ट्या अरूंधती रॉय यांची मुलाखत प्रसारित

काही घंट्यांनंतर मी परत एकदा ‘डीडब्ल्यू’ वरील वृत्त पाहिले. तेच वृत्त परत झळकत होते. तेच छायाचित्रण, त्याच भाजीविक्रेत्यांच्या तक्रारी प्रसारित केल्या जात होत्या; परंतु पूर्वीच्या महिला टीकाकाराच्या ऐवजी आता हिंदुद्वेष्ट्या आणि भारतद्वेष्ट्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेखिका अरूंधती रॉय यांची मुलाखत दाखवण्यात येत होती. हे मात्र थोडे विचित्रच वाटले.

अरूंधती रॉय यांनी बोलायला चालू केले. त्या भारताच्या विरोधात गरळच ओकू लागल्या. त्यांचा लबाड आणि धोकादायक हेतू स्पष्ट लक्षात येत होता. भारताच्या विरोधात भयंकर खोटे बोलण्यासाठी रॉय प्रसिद्ध आहेत. या वेळी त्या खूप भयावह असे सांगत आहेत, असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत होता. ‘डीडब्ल्यू ने पूर्वीच्या महिला टीकाकाराची मुलाखत का रहित केली ? त्या पुरेशा लबाड नव्हत्या का ?

अरूंधती रॉय यांची निखालस खोटी वक्तव्ये :

अरूंधती रॉय यांचा व्हिडिओ ‘डीडब्ल्यू’ने ट्विटरवरही प्रसारित केला आहे. त्या म्हणतात, ‘‘भारतातील परिस्थिती नरसंहाराकडे मार्गक्रमण करत आहे; कारण सरकारचा तो अजेंडाच आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून जमावाकडून मुसलमानांना ठेचून ठार मारण्याचे प्रकार वाढले आहेत. अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना कलंकित करण्याचा कट रचला गेला आहे. यातून मोठ्या हिंसाचाराचा धोका निर्माण झाला आहे.’’ हा व्हिडिओ सर्व सामाजिक संकेतस्थळावरूनही प्रसारित करण्यात आला.

एवढेच बोलून रॉय थांबलेल्या नाहीत. त्या पुढे म्हणतात, ‘‘देहलीतील हत्याकांडाच्या (त्यांच्या मते अल्पसंख्यांकांचे हत्याकांड झाले) पार्श्‍वभूमीवर मोठा हिंसाचार झाला. भाजपचे मातृत्व असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदु राष्ट्र हवे आहे. संपूर्ण जग मोदींचा उदोउदो करत आहे; मात्र त्यांना मोदींच्या या कार्यक्रमाची (हिंदु राष्ट्र) कल्पना नाही. त्यांचे कैदखाने उभारण्याचे काम चालू आहे.’’ भारतातील सद्यःस्थितीची तुलना त्यांनी ‘रुवांडा’ या आफ्रिकेतील देशासमवेत केली. ‘रुवांडामध्ये मोठ्या नरसंहारापूर्वी पूर्वी जी स्थिती होती, तशीच स्थिती भारतात निर्माण झाली आहे’, असेही त्या म्हणाल्या. ‘भारतातील या घटनांकडे जगाने लक्ष ठेवावे’, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या निवेदकाने रॉय यांचे आवाहन पुष्कळ महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘रॉय यांनी सत्य सांगितले आहे’, असे गृहीत धरल्यास आणि भारताने असे हत्याकांड घडवून आणण्याचा कट रचला असल्यास ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो ? असा प्रश्‍न निवेदकांनी या वेळी उपस्थित केला. या वेळी निवेदकांनी रॉय यांची ओळख करून देतांना त्या एक ‘प्रशंसित बुद्धीप्रामाण्यवादी’ असल्याचे सांगितले.

अरूंधती रॉय

भारताची प्रतिमा मलीन करण्याचा रॉय यांच्याकडून प्रयत्न

रॉय यांच्या वक्तव्याने मला धक्काच बसला. त्यांनी भारताविषयी जगासमोर खोटे आणि अत्यंत धोकादायक चित्र उभे केले. भारतात हिंदूंनी अल्पसंख्यांकांचे हत्याकांड घडवून आणण्याची योजना आखली आहे, असे खोटे विधान करून त्यांनी जगात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्विटरवर भारतातील अल्पसंख्यांकांना पाठिंबा दर्शवणे चालू झाले. काहींनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगासमोर उपस्थित करणार असल्याचे ट्वीट केले.

हिंदूंनी नाही, तर धर्मांधांनी हत्याकांड घडवले !

हिंदूंच्या मानसिकतेविषयी कुणी थोडा जरी अभ्यास केलेला असेल, तर त्यांच्या लक्षात येईल की, नरसंहार करणे हिंदूंच्या रक्तातच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तसे कधी घडले नाही आणि पुढेही घडणार नाही. एखादी व्यक्ती कुठल्या तरी इतर देवाला मानते म्हणून तिची हत्या करणे, हे हिंदूंसाठी अकल्पनीय आणि हास्यास्पद आहे. उलट गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदूंनाच जिहाद आणि धर्मांतर यांना सामोरे जावे लागत आहे. या कालावधीत लाखो हिंदूंची कत्तल करण्यात आली. धर्मांधांनीच ही हत्याकांडे घडवून आणली होती.

अरूंधती रॉय यांचे कार्य म्हणजे भारताच्या इस्लामीकरणाला पाठिंबा !

भारतात अल्पसंख्यांकांवर खरोखरच अत्याचार होतात, हे खोटेच जगासमोर आणण्यासाठी त्यांना हिंदूंच्या विरोधात भडकवण्याचे काम रॉय यांनी चालवले आहे. त्यासाठी हिंदूंचे राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. भारताच्या विरोधात युद्ध छेडून त्याचे इस्लामीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाला पाठिंबा देण्याचे कार्य अरूंधती रॉय करत आहेत. रॉय आणि त्यांचा गट ‘भारतीय हिंदू आक्रमक आहेत’, असे चित्र उभे करून त्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की, जगभरात पसरलेल्या हिंदूंकडून कुणाला कधी त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. उलट जगभरात मुसलमान धोकादायक आणि हिंसक असल्याचे सिद्ध झाले आहे.

सहिष्णु हिंदू !

हिंदूंची श्रद्धा धर्मावर आधारलेली आहे. त्यांच्या मते सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केलेले योग्य आचरण म्हणजे धर्म ! चांगले हिंदू नेहमी इतरांकडे बंधू-भगिनी म्हणून पहातात. ते प्राणीमात्र आणि निसर्ग यांवरही प्रेम करतात. मानवामध्ये ‘ईश्‍वराने निवडलेले आणि अनंतकाळ धिक्कारलेले’ असा भेदभाव ते करत नाही. हिंदु मुलांना अहिंदूंचा द्वेष करण्याची शिकवण कधीच दिली जात नाही. कट्टरपंथियांमध्ये ‘देव केवळ त्यांच्यावरच प्रेम करतो, दुसर्‍या धर्मांतील मुलांवर प्रेम करत नाही’, अशी शिकवण दिली जाते. हिंदू एवढे साधे-भोळे आहेत की, कट्टरपंथियांच्या मनातील या दुष्ट  विचारांचा त्यांना थांगपत्ताच लागत नाही. स्वत:ला मिळत नाही, ते विशेषाधिकार ते मूर्खपणाने मुसलमान आणि ख्रिस्ती यांना बहाल करतात.

अनुमाने १०० वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला सतर्क करतांना म्हटले होते की, प्रत्येक धर्मांतर केलेली व्यक्ती म्हणजे एक हिंदु न्यून होणे नव्हे, तर एक शत्रू वाढणे होय. योगी अरविंद यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, धर्मांतर करून जे हिंदू धर्मापासून दूर गेले आहेत, त्यांचा नवीन धर्मावरील विश्‍वास उडेल, जो त्यांनी दबावापोटी किंवा प्रलोभनांना बळी पडून स्वीकारला आहे.

सत्याला धरून असलेल्या हिंदु धर्माची महानता !

जे सत्य आहे, त्याला दबाव आणि प्रलोभन यांची आवश्यकता नसते. असत्य बलपूर्वक किंवा कायद्याचा बडगा दाखवून लादले जाते. त्यामुळे सत् सोडून अन्य गोष्टी लोकांवर लादल्या जातात. हिंदु मतप्रणाली नक्कीच सत्याला धरून असते. हिंदु धर्म स्वीकारावा; म्हणून कुणावरही बळजोरी केली जात नाही. तरीही अगदी संकटग्रस्त परिस्थितीतही तो धर्म टिकून राहिला आणि आता पाश्‍चात्त्य देशांतील लोक चर्चला कंटाळून स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारत आहे. पाश्‍चात्त्यांना भारतीय तत्त्वज्ञान जेव्हा समजले, तेव्हाच आधुनिक विज्ञानाने सर्वांची निर्मिती एकाच शक्तीपासून झाल्याचा शोध लावला. ज्या देशांमध्ये हिंदु धर्माची पाळेमुळे रुजलेली आहेत, संस्कृतसारखी परिपूर्ण, प्रतिष्ठित आणि शक्तीशाली भाषा शिकवली जात आहे, शाळांमधून योगशिक्षण दिले जात आहे, त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी आदर्श आहेत. ज्या देशांमध्ये वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जातो, ज्या तत्त्वज्ञानामुळे अणूशक्तीच्या संशोधनाला प्रेरणा मिळाली, जेथे रामायण आणि महाभारत अभ्यासले जाते, ज्या ठिकाणी मुले ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ असे म्हणतात, त्या देशामध्ये कुणी काळजी करण्याची आवश्यकताच नाही.

हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान योग्यच !

जे भारतीय इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथांमध्ये धर्मांतरित झाले आहेत, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या योगदानाविषयी गर्व वाटत नाही का ? भारत गौरवशाली संस्कृतीचे माहेरघर आहे. ज्ञानाची खाण होती आणि पृथ्वीवरील सर्वांत श्रीमंत देश होता. भारतात विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेमध्ये ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ असे पठण करायला सांगितले जात असेल, तर त्याला मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा आक्षेप असूच शकत नाही. ‘ही शिकवण जातीयवादी आहे’, असे म्हणणे द्वेषयुक्त आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) म्हणणारे नव्हे, तर चुकीचे तत्त्वज्ञान आत्मसात करणारेच समाजात फूट पाडत आहेत.

जगभरातून मानवतेच्या भल्यासाठी लाखो वर्षे चिरंतन आणि मौल्यवान असे आत्मज्ञान राखून ठेवलेल्या भारतमातेविषयी एक दिवस कृतज्ञता व्यक्त होणार !

– मारिया वर्थ, जर्मन लेखिका