परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

साधकांचे जीवन आनंदी करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरुडॉ. आठवले यांनी माझ्या चित्तात कुलदेवतेच्या नामाचे बीज रोवले. त्याच्यातून निर्माण झालेला व्यष्टी साधनेचा वेल जनलोकी गेला आहे, म्हणजे माझी प्रगती करवून घेऊन त्यांनी मला संतपदाला पोचवले आहे. त्यांनी लावलेल्या सनातन संस्थारूपी इवल्याशा रोपाचा विशाल असा अध्यात्मप्रसाररूपी वटवृक्ष जगभर पसरला आहे आणि त्यांच्याच कृपेने त्या वृक्षाला लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे मधुर फळ येणार आहे. 

पू. शिवाजी वटकर

१. व्यष्टी साधनेचा वेल

परम पूज्यांनी (टीप १) कुलदेवतेच्या
नामाचे बीज रुजवले माझिया अंतरी ।

बीज अंकुरले अन् कुंडलिनी शक्तीचा प्रवाह
चालू केला मूलाधारचक्रापासूनी ॥ १ ॥

स्वभावदोष नि अहंरूपी तण काढले
माझ्या मनाच्या भूमीतूनी ।

सत्संग, सेवा, त्याग, प्रीती नि भावरूपी खतपाण्याने
वेल धावतसे सहस्राराच्या दिशेनी ॥ २ ॥

परम पूज्यांनी वेल वाढवूनी सोडवले मजला
जन्म-मृत्यूच्या दुष्टचक्रातूनी ।

‘गुरुकृपायोगा’ने (टीप २) साधनेचा वेल
पोहोचला आहे जनलोकी (टीप ३) ॥ ३ ॥

वेलूवर आनंद नि चैतन्य यांची फुले बहरली ।
वाहतो कृतज्ञतारूपी पुष्पांची ओंजळ
मोक्षगुरु परम पूज्यांच्या चरणी ॥ ४ ॥

२. समष्टी कार्याचा वटवृक्ष

सनातन संस्थेचे इवलेसे रोप लावियेले परम पूज्यांनी ।
संत भक्तराज महाराज यांचे कृपाछत्र असे त्यावरी ।
संत, ऋषिमुनी अन् देवता त्या रोपट्याचे रक्षण करी ॥ १ ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥ २ ॥

त्या सुगंधी फुलांची ओंजळ अर्पूया ।
श्रीविष्णुस्वरूप परम पूज्यांच्या चरणी ।
त्यांच्या चरणी प्रार्थना करूया ।
‘वटवृक्षाला हिंदु राष्ट्राचे मधुर फळ येण्या सत्वरी’ ॥ ३ ॥

टीप १ – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे.
टीप ३ – परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी अध्यात्मिक प्रगती करवून घेऊन मला संतपदी पोचवले आहे.

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संताच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक