युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश

(युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफीक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन – संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना)

नवी देहली – युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की,

पंतप्रधान नरेंद्र मोदी

यामुळे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली ही जगन्मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्र यांनी अनेक शतकांपासून संस्कृती आणि चेतना यांची जोपासना केली आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला कायम प्रेरणा देत राहील.