भारतीय स्वातंत्र्ययुद्धावर ‘भगवद्गीते’चा प्रभाव !
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या देशभक्तांचे विचार आणि अनुभव यांचे विश्लेषण केले, तर गीतेच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर किती प्रभाव पडला, हे समजून येते. गीता हा केवळ एक शास्त्रग्रंथ न रहाता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा देणारे ते एक ‘शस्त्र’ ठरले.’