मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आपल्या मंदिरांविषयी कुणीही चुकीचे वक्तव्य करण्यास धजावणार नाही आणि वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य करणार नाही, असे प्रभावी संघटन झाले पाहिजे. मंदिर विश्‍वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हातात दिले पाहिजे !

भारतातील प्रसिद्ध हिंदु खेळाडू, अभिनेते कधीही हिंदु धर्माविषयी बोलत नाहीत; कारण असे बोलले, तर त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल, असे त्यांना वाटत असते; मात्र येथे वीरेंद्र सेहवाग यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाचा विरोध केल्यामुळे त्यांचे कौतुकच करायला हवे !

विश्‍व हिंदु परिषद देशातील ४ लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात अभियान राबवणार !

विहिंपचे हे स्तुत्य अभियान आहे. असे असले, तरी केंद्र सरकारने आणि भाजप शासित राज्यांनीच मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मालमत्ता जप्त करा ! – औद्योगिक न्यायालयाचा आदेश

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम ! समितीच्या यापूर्वीच्या कारभारातही अनेक अपप्रकार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे रोखण्यासाठी देवस्थानांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !

हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ असलेल्या ज्वालामुखी मंदिरामध्ये मुसलमान अधिकार्‍यांची नियुक्ती ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक !

देवस्थानाचा कारभार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक निर्णयाविषयीची माहिती देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाला द्या !  – धर्मादाय विभागाच्या उपायुक्तांचा आदेश

आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’

कोल्लूरू मुकांबिका मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या अपव्यवहाराच्या अन्वेषणामध्ये मंदिर महासंघालाही सहभागी करून घ्यावे ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

‘हिंदुत्वनिष्ठांचे ‘फेसबूक पेज’ बंद, तर अन्य पंथीय त्यांच्या ‘फेसबूक’वरून विखारी प्रचार करत असतांना ते चालू ठेवणे’, या हिंदूविरोधी कृत्याला विरोध करण्यासाठी ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ करणे