उडुपी (कर्नाटक) – कोल्लूरू मुकांबिका मंदिराच्या अपव्यवहाराच्या संदर्भात मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाने या प्रकरणाविषयी माननीय धर्मादाय आयुक्त, बेंगळूरू आणि धर्मादाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून महासंघालाही या अन्वेषणात सहभागी होण्याची संधी मिळावी, अशी विनंती करत आहोत. अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्या भ्रष्ट अधिकार्यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वबाजूंनी अन्वेषण होण्याच्या दृष्टीने भक्तांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
१. श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले की, अपव्यवहाराची चौकशी करण्याचे त्वरित आदेश दिल्याविषयी मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ आभार मानत आहे; परंतु केवळ एका दिवसाच्या चौकशीतून आतापर्यंतचे सर्व अपव्यवहार उघड होणे शक्य होणार नाही. तरी माननीय सचिवांनी लगेच सकारात्मक कृती करणे हे खरोखर कौतुकास्पद असून याविषयी धर्मादायमंत्री श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांचेही आभारी आहेत.
२. या पत्रकार परिषदेत महासंघाचे सदस्य श्री. मधुसूदन अय्यर, श्री. दिनेश एम्.पी., श्री. श्रीनिवास आणि हिंदु जनजागृती समितीचे उडुपी येथील समन्वयक श्री. विजयकुमार उपस्थित होते.