देव तारी.. !
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.
धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.
भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.
भाजपशासित राज्यांतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी विहिंपने तेथील सत्ताधारी शासनकर्त्यांशी संवाद साधून तसे प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदुद्वेषी पक्षांची सरकारे आहेत, तेथे मात्र हिंदूंचे परिणामकारक संघटन करून आंदोलन उभारण्याला पर्याय नाही !
आज विविध राज्यांतील सरकारांनी मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा सपाटा लावला असतांना रावत यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या अवघ्या एका मासात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची केलेली धडाकेबाज घोषणा सुखद आहे.
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. या प्रचाराच्या वेळी कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरू मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तमिळनाडूत भाजपची सत्ता आल्यास सरकारने अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे परत करू’, असे आश्वासन दिले.
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधामसहित ५१ मोठी मंदिरे देवस्थान बोर्डातून म्हणजेच सरकारीकरणातून लवकरच मुक्त करण्यात येतील, असे आश्वासन साधू आणि संत यांना दिले.
तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !
मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने तेथील सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ती कुठल्याही राजकीय पक्षांच्या किंवा प्रशासनाच्या नव्हे, तर भक्तांच्याच कह्यात हवीत !