भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत. काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंसाठी ‘हिंदू अमरनाथ बाबा लंगर असोसिएशन’ची स्थापन करण्यात आली; पण सरकारने तिला अवैध ठरवले. तसेच काश्मिरी मुसलमानांना व्यवसाय मिळावा; म्हणून हिंदूंचे इतर लंगर (निःशुल्क भोजनव्यवस्था) बंद करण्यात आले.