आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काँग्रेसवर बंदी घाला !

जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्येवर बंदी आणणारे विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला.

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

अशा देशांवर कठोर कारवाई हवी !

अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्याची गळपेची करणार्‍या १० देशांची सूची बनवली आहे. यांत चीन, पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया आदींचा समावेश आहे. ‘या देशांच्या  विरोधात कारवाई करण्याची सिद्धता करत आहोत’, अशी चेतावणीही अमेरिकेने दिली आहे.

भ्रष्टाचार्‍यांनाही फाशीची शिक्षा हवी !

कोरोनावर मात करण्याच्या कामामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र तक्रारी केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मंत्रालयांतील घोटाळे, लाचखोरी, निधीची भरपाई, तसेच सरकारी अधिकार्‍यांकडून केला गेलेला छळ, अशा तक्रारींचा समावेश आहे.

आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षीच्या ११ मासांमध्ये सुरक्षादलांनी २११ आतंकवाद्यांना ठार केले, तर ४७ जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या नावाने त्यात घुसलेल्या धर्मांध संघटना !

नवी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना साहाय्य करणार्‍या संघटनांमध्ये देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे. तिला २५ मशिदींमधून साहाय्य मिळत आहे.

समान नागरी कायदा लागू करा !

इस्लामसारख्या एखाद्या धर्मात एकापेक्षा अधिक पत्नींची प्रथा असण्याची आणि इतर धर्मांमध्ये यावर प्रतिबंध लावण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बेशिस्त भारतियांना लज्जास्पद !

जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना न्यूनतम ५ ते १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.