आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

गुरुग्राम (हरियाणा) येथे अतिक्रमण हटवणार्‍या पथकावर दगडफेक केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि स्थानिक नरगसेविका निशा सिंह यांच्यासह एकूण १० महिलांना न्यायालयाने ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

१५ टक्के असणाऱ्यांचा सण ‘राष्ट्रीय सण’ कसा ?

१५ टक्के असणाऱ्यांचा सण ‘राष्ट्रीय सण’ कसा ?

महाराष्ट्र सरकारने ईद हा ‘राष्ट्रीय सण’ असल्याचे सांगत त्यानिमित्ताने प्रथमच पुढील मे मासाचे वेतन एप्रिल मासाच्या वेतनासमवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

पंजाबमधील हिंदुविरोधी खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

पंजाबमधील हिंदुविरोधी खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

पतियाळा (पंजाब) येथे ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेकडून खलिस्तानच्या विरोधात ‘खलिस्तान मुर्दाबाद’ नावाने मोर्चा काढण्यात आला. त्याच्या विरोधात काही शिखांनी खलिस्तान समर्थनार्थ मोर्चा काढून शिवसेनेच्या मोर्च्यावर आक्रमण केले.

अशांना कारागृहात टाका !

अशांना कारागृहात टाका !

आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७० ते ८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर आमची २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील, अशी धमकी झारखंडचे मंत्री हफीजुल अंसारी यांनी दिली आहे.

समान नागरी कायदा झालाच पाहिजे !

समान नागरी कायदा झालाच पाहिजे !

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगत त्याला विरोध केला आहे. बोर्डाचे महासचिव मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांनी म्हटले की, हा कायदा देशातील नागरिक स्वीकारणार नाहीत.

पाकमध्येच नव्हे, तर भारतातही बहुतांश ठिकाणी असेच आहे !

पाकमध्येच नव्हे, तर भारतातही बहुतांश ठिकाणी असेच आहे !

पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

प्रत्येक शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवा !

प्रत्येक शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवा !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे.

संपूर्ण देशात असे करा !

संपूर्ण देशात असे करा !

देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली.

सरकारने यावर स्वतःहून बंदी घालावी !

सरकारने यावर स्वतःहून बंदी घालावी !

हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर, तसेच हलाल प्रमाणपत्रे देण्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी विभोरआनंद यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

अशांकडून हिंदूंनी दागिन्यांची खरेदी का करावी ?

अशांकडून हिंदूंनी दागिन्यांची खरेदी का करावी ?

एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनेच्या अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ विज्ञापनात अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या कपाळावर टिकली नाही. यामुळे या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध होत आहे.