हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

केरळ येथे अभिनंथ या २७ वर्षीय हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह करून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अभिनंथ आणि त्याची आई लेखा यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

भारतात अशी कठोर कारवाई कधी होणार ?

इस्लामी आतंकवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर टीका करणे आणि तिचा निषेध करण्यास नकार दिल्याने सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.

हिंदूंच्या मंदिरांचा निधी धर्मासाठी खर्च व्हावा ! 

पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

साम्यावाद्यांची हिंसाचारी वृत्ती जाणा !

भारतात ‘अ‍ॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विन्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणी साम्यवादी विद्यार्थ्यांची संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’चा स्थानिक अध्यक्ष कॉम्रेड श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे.

अशा कार्यक्रमांवर बंदी घालायला हवी !

‘बिग बॉस’मध्ये केवळ भांडणे, मारामारी, राजकारण आणि अश्‍लील भाषेत केलेले संभाषण पहायला मिळते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मनोरंजन होत नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो, असे विधान अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी एका मुलाखतीत केले आहे.

आशियातील अल्पसंख्य संघटनेच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

भारतातील असहिष्णुतेत गेल्या २ वर्षांत वाढ झाली असून देश मुसलमानांसाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असे मत ‘दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज’ या अहवालात मांडण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाची ढोंगी रामभक्ती जाणा ! 

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.

मंदिरांची ही लूट रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे एका प्राचीन शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करतांना गावकर्‍यांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये सापडलेले ५६५ ग्राम सोने सरकारी अधिकार्‍यांनी सरकार जमा केल्याने गावकरी ते परत मिळवण्यासाठी चळवळ राबवत आहेत.

शेतकरी आंदोलनाला खलिस्तान्यांचे समर्थन जाणा !

भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला.

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

केरळच्या मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.