नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

जोशीमठाची मानवनिर्मित शोकांतिका !

‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.

ब्राझिलमध्‍ये लोकशाही संपेल ?

समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तर उंचावण्‍यासाठी व्‍यवस्‍थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्‍यांनी सामाजिक सुसंपन्‍नतेसाठी उपाययोजना काढल्‍यास जगाचे भले होईल !

मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

पाकच्‍या जिहादचे फलित !

भविष्‍यात भारतातील अल्‍पसंख्‍य कट्टरतावादी बहुसंख्‍य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्‍यकारभार त्‍याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्‍यामुळेच लोकशाही टिकून आहे !’

जैन समाजाचे यश !

हिंदूंनो, जैनांकडून शिका ! मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच गडदुर्ग येथे होणारे अपप्रकार, तेथील अतिक्रमणे हे सर्व दूर करण्‍यासाठी धर्माविषयी जागरूक असणारे काही हिंदू कृतीशील होत आहेत; पण धर्मरक्षणासाठी तुटपुंजे नव्‍हे, तर हिंदूंचे भव्‍य संघटन अपेक्षित आहे. हे भव्‍य संघटनच हिंदु राष्‍ट्राची वाट सुकर करेल, हे निश्‍चित !

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?

राष्ट्रवादी कि ‘ब्रिगेडी’ ?

धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

निराधार काश्मिरी हिंदू !

३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !