नूंह येथील भयानकता !


नूंह (मेवात, हरियाणा) येथे विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्‍या ब्रजमंडल शोभायात्रेवर ३१ जुलैला झालेल्‍या धर्मांध मुसलमानांच्‍या आक्रमणाने मेवातसह अन्‍य ३ ते ४ जिल्‍ह्यांमध्‍ये जाळपोळ आणि दंगल झाली. सरकारी आकडेवारीनुसार ४-५ हिंदूंचा मृत्‍यू, तर काही घायाळ झाले. धर्मांधांच्‍या आक्रमणानंतर मेवात काही दिवस धुमसत असल्‍याने नेमकी परिस्‍थिती काय आहे ? याचा अंदाज येत नव्‍हता. आता तेथील धक्‍कादायक माहितीचे व्‍हिडिओ, स्‍थानिकांचे म्‍हणणे, काही वृत्तवाहिन्‍यांचे ‘स्‍टिंग ऑपरेशन’ या माध्‍यमातून पुढे येत आहे. ब्रजमंडल शोभायात्रेवर धर्मांधांनी आक्रमण केल्‍यावर बेसावध हिंदू ज्‍यामध्‍ये महिला, मुले, वयोवृद्ध व्‍यक्‍ती होत्‍या, त्‍यांनी एका स्‍थानिक मंदिरात आश्रय घेतला होता. हिंदूंची संख्‍या ३ सहस्रांहून अधिक होती. या मंदिराला लागूनच डोंगराळ भाग आहे. या डोंगराच्‍या कडेकपारीत लपून धर्मांध हिंदूंवर चहुबाजूंनी काही घंटे गोळीबार करत होते, अशी माहिती स्‍वत: अतिरिक्‍त पोलीस महासंचालक ममता सिंह यांनीच दिली.

महिलांवर अत्‍याचार ?

आता २ दिवसांमध्‍ये उघड झालेल्‍या घटनांमध्‍ये अनेक महिलांचे फाटलेले कपडे जवळच्‍या शेतात, झाडांवर, रस्‍त्‍यावर सापडले आहेत. तेथील स्‍थानिकांच्‍या म्‍हणण्‍यानुसार धर्मांधांनी मंदिरातून हिंदु मुली-महिलांना ओढत जवळच्‍या शेतात नेऊन त्‍यांच्‍यावर सामूहिक अत्‍याचार केला. हिंदु महिला भाविकांना बसमधून बाहेर ओढत त्‍यांच्‍यावर अत्‍याचार करण्‍यात आला. मंदिरात आश्रय घेतलेल्‍या सहस्रो महिलांपैकी अनेक महिला-मुली अद्यापही बेपत्ता असून त्‍यांचा शोध चालू आहे. अनेक महिलांनी माध्‍यमांसमोर त्‍यांच्‍यावरील आपबिती रडत सांगितली. ‘पांचजन्‍य’, तसेच काही वृत्तवाहिन्‍यांच्‍या ‘ट्‍विटर हँडल’ने ही माहिती दिली आहे. धर्मांधांची टोळी दिवसभर गोळीबार करत होती आणि एकदा वीजही घालवण्‍यात आली. धर्मांध दिवस सरण्‍याची वाट पाहून आमच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करण्‍याचे नियोजन करत होते. उपस्‍थित हिंदु तरुण आणि नंतर पोलीस आल्‍यामुळे आमची अब्रू वाचली. महिलांची संख्‍या अधिक असल्‍याने काही महिलांचे रक्षण झाले, तरी अनेक महिलांवर अत्‍याचार झाला असण्‍याची शक्‍यता प्रत्‍यक्षदर्शींच्‍या सांगण्‍यावरून प्राथमिकदृष्‍ट्या समजते. पोलिसांनी अद्याप महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांना दुजोरा दिलेला नाही. ममता सिंह यांचे सहस्रो हिंदूंचा जीव वाचवल्‍याविषयी कौतुक होत असले, तरी बेपत्ता हिंदु पुरुष आणि महिला यांच्‍याविषयी चांगल्‍या अन्‍वेषण यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे. तेथे हिंदु भाविक महिला-मुली यांच्‍यावर कशा प्रकारे अत्‍याचार झाले ? हे जगासमोर आले पाहिजे.

पोलीस-प्रशासनाची अनास्‍था !

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज

हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांचे एक धक्‍कादायक विधान समोर आले आहे. ते म्‍हणतात, ‘‘दुपारी ३ वाजेपर्यंत नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून एवढी भीषण परिस्‍थिती निर्माण केली, याची कल्‍पनाच नव्‍हती.’’ आता याला काय म्‍हणावे ? गुप्‍तचर विभाग झोपा काढत होता का ? धर्मांध ‘एके ४७’ रायफली, बंदुका, पेट्रोल गोळा करून हिंदूंवर आक्रमण करण्‍याचे एवढे मोठे नियोजन करत असतांना त्‍याची कल्‍पना नाही म्‍हणणे आणि तेही मुसलमानबहुल संवेदनशील भागात हे आश्‍चर्य करणारे नव्‍हे, तर चीड आणणारे आहे. मुख्‍यमंत्री खट्टर म्‍हणतात, ‘‘पोलीस किंवा सैन्‍य प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे रक्षण करू शकत नाहीत.’’ या विधानाविषयी खट्टर यांनी नंतर सारवासारव केली, तरी त्‍यांनी दुर्दैवी वस्‍तूस्‍थितीच सांगितली आहे. सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, तर हिंदूंना स्‍वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार का ? जेणेकरून ते स्‍वत:सह कुटुंबाचे रक्षण करू शकतील ! दंगल जेव्‍हा घडते, तेव्‍हा पोलीस केवळ कायदा-सुव्‍यवस्‍था सुधारण्‍यास भर देतात; मात्र त्‍याच्‍या मुळाशी जाण्‍याचा प्रयत्न अल्‍प होतो. परिणामी पुन:पुन्‍हा दंगली होतच रहातात.

सर्व धर्मांध एकच !

प्रशासनाने ‘योगी पॅटर्न’ वापरत दंगलखोरांच्‍या अनधिकृत झोपड्या, घरे, दुकाने पाडण्‍यास प्रारंभ केला आहे. यामुळे दंगल पीडितांना थोडातरी दिलासा मिळाला असेल; मात्र श्रद्धाळू हिंदु भाविकांवर आक्रमण करणार्‍या अन् हिंदु महिलांच्‍या अब्रूला हात घालणार्‍यांना जन्‍माची अद्दल घडेल, अशी शिक्षा प्रशासनाने करावी, ही भारतियांना वाटते. असे असतांना मेवात येथील धर्मांधांवरील कारवाईमुळे महाराष्‍ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दंगलखोर धर्मांधांची बाजू घेत ‘या कारवाईचा प्रतिशोध घेतला जाईल’, असे म्‍हटले आहे. आझमी यांच्‍या या विधानातून ते दंगलखोर धर्मांधांना पाठीशीच घालत आहेत, हे लक्षात येते. यातून ‘आम्‍ही एकच आहोत’, हा संदेशच अबू आझमी यांनी दिला आहे. त्‍यामुळे हिंदूंनी सावध होण्‍याची आवश्‍यकता आहे.

धर्मांधांचे जाळे आणि ‘नरेटिव्‍ह सेट (कथानक रचणे)’ करणे किती पद्धतशीर असते ? याचा अनुभव या दंगलीच्‍या निमित्तानेही आला. धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्‍यानंतर त्‍वरित ‘झू बिअर’ या महंमद झुबेर यांच्‍या ‘ट्‍विटर हँडल’वरून ‘हिंदूंनी शोभायात्रेत मुसलमानांच्‍या भावना प्रक्षुब्‍ध करणारी गाणी लावली होती’, असा आरोप केला. एका मोठ्या हिंदुविरोधी वृत्तवाहिनीने एके ठिकाणी कचर्‍याला लावलेली आग दाखवून ‘गरीब मुसलमानांच्‍या झोपड्या प्रशासनाने जाळल्‍या’, असे वार्तांकन केले. धर्मांध  मशिदींना आग लावून हिंदूंविरुद्ध वातावरण सिद्ध करण्‍याचा प्रयत्न करत असतांना हिंदूंनाच दोष देण्‍यात आला. तात्‍पर्य धर्मांधांनी केवळ हिंदूंवर आक्रमण करण्‍याचेच नव्‍हे, तर स्‍वत: निष्‍पाप असण्‍याचे जगाला दाखवण्‍याचेही षड्‍यंत्र आखले होते, हे लक्षात येते. पोलीस-प्रशासनाने धर्मांधांचे सर्वच षड्‍यंत्र कधी उघडे करणार ?

नूंह येथील हिंदु पुरुष-महिलांवर झालेला अत्‍याचार जगासमोर आणून धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी वैध मार्गाने लढा देणे आवश्‍यक !