धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

बिहारमधील रावणराज !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्‍यावर खालच्‍या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्‍य ती कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्‍हणजे परत कुणी अशी वक्‍तव्‍ये करण्‍याचे धाडस करणार नाही.

बिहारच्‍या जातीगणनेचे गाजर !

बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्‍या व्‍यवस्‍थेमुळे समान न्‍याय मिळाला नाही आणि आम्‍हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्‍याचा प्रयत्न करतात. प्रत्‍यक्षात मात्र प्रत्‍येक गोष्‍टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्‍याशीच त्‍यांचा स्‍वार्थ जोडलेला असतो.

नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

जोशीमठाची मानवनिर्मित शोकांतिका !

‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.

ब्राझिलमध्‍ये लोकशाही संपेल ?

समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तर उंचावण्‍यासाठी व्‍यवस्‍थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्‍यांनी सामाजिक सुसंपन्‍नतेसाठी उपाययोजना काढल्‍यास जगाचे भले होईल !

मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

पाकच्‍या जिहादचे फलित !

भविष्‍यात भारतातील अल्‍पसंख्‍य कट्टरतावादी बहुसंख्‍य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्‍यकारभार त्‍याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्‍यामुळेच लोकशाही टिकून आहे !’

जैन समाजाचे यश !

हिंदूंनो, जैनांकडून शिका ! मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच गडदुर्ग येथे होणारे अपप्रकार, तेथील अतिक्रमणे हे सर्व दूर करण्‍यासाठी धर्माविषयी जागरूक असणारे काही हिंदू कृतीशील होत आहेत; पण धर्मरक्षणासाठी तुटपुंजे नव्‍हे, तर हिंदूंचे भव्‍य संघटन अपेक्षित आहे. हे भव्‍य संघटनच हिंदु राष्‍ट्राची वाट सुकर करेल, हे निश्‍चित !

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?