नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

२६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार

देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?

फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

२ युवक चारचाकी वाहनामध्ये बसून दोनशे आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होते.

आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसच्या नावांचा उल्लेख केला आहे.

घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

भाजपचे तारकिशोर प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत व त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्याने सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

बनवेगिरी करणार्‍यांनी ३ सहस्र जणांची आर्थिक हानी केली !

विजय गुरनुले आणि अविनाश महादुले या मावसभावांनी दळणवळण बंदीच्या काळात ‘मेट्रो रिजन ट्रेडिंग कंपनी’ या आस्थापनाच्या नावाखाली ३ सहस्र लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे.

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला कृषी महाविद्यालयात चाकरी

ऐन भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणी यांना त्यांच्या भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले.

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !