आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

  • ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरण

  • कमलनाथ यांच्या मुलाचा आणि भाच्याचाही यात समावेश

केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

नवी देहली – इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसचे मोठे नेते सलमान खुर्शिद आणि अहमद पटेल यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. तसेच  मध्यप्रदेशचे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा बकुल नाथ, तसेच भाचा रतुल पुरी यांचे नावही घेतले आहे. ‘माझ्या मुलाचा या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही’, असे स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिले आहे. (म्हणजे भाचा रतुल पुरी याचे संबंध आहेत, असे कलमनाथ यांना म्हणायचे आहे, असेच स्पष्ट होते ! – संपादक) तसेच सलमान खुर्शिद यांनीही हा आरोप फेटाळला आहे.

 (सौजन्य : ABP NEWS)

जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना वर्ष २०१९ मध्ये दुबई येथून प्रत्यार्पण करून आणण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची ३८५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.