अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या परिसरात २ युवक चारचाकी वाहनामध्ये बसून दोनशे आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होते. या वेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत संजय चौधरी यास अटक करण्यात आली असून संजय पांचाळ हा पळून गेला आहे. या चारचाकी वाहनातून ५ सहस्र २५० रुपयांच्या बनावट नोटा, २ भ्रमणभाष आणि चारचाकी वाहन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.


या धाडीमध्ये जप्त केलेल्या नोटांची नाशिक येथील नोटा छापण्याच्या कारखान्यात पडताळणी करण्यात येणार आहे. संजय चौधरी यांना १७ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर पोलिसांची २ पथके पळून गेलेल्या संजय पांचाळ याचा शोध घेत आहेत.