नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ नाही ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, काँग्रेस

स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती !

कोल्हापूर जिल्ह्यात १३५ पाणीपुरवठा योजना रखडल्या !

राजकीय साठमारीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना प्रलंबित रहात असतील, तर जनतेच्या कराची होणारी उधळपट्टी कधीच थांबणार नाही.

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.

आसाममधील ‘एआययूडीएफ’च्या ‘अजमल फाऊंडेशन’ला विदेशी जिहादी संघटनांकडून मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या ! – ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’चा दावा

‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी खासदार प्रेमसिंग शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

श्रीराममंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब द्या ! – छत्तीसगडचे काँग्रेसचे मंत्री सिंहदेव यांची मागणी

मंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब मागण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे; मात्र आजन्म मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेसला हा अधिकार आहे का ? काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या मंदिर होऊ नये, यासाठीच प्रयत्न केले होते, हे हिंदू विसरणार नाहीत !

पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार्‍या सार्वजनिक बँका तपशील लपवून ठेवत आहेत ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्‍या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्‍या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे.

अमित चांदोले यांची कोठडी वाढवण्याची अंमलबजावणी संचालनालयाची मागणी

चांदोले यांच्याकडून प्रताप सरनाईक यांना पैसे जात होते, असे पुराव्यांतून दिसत आहे.

कलंकित लोकप्रतिनिधी !

भारतीय राजकारणाने किती खालचा स्तर गाठला आहे, ते मोजण्यासाठी कोणतीही फूटपट्टी नाही. नीतीमत्ता, आर्थिक अपहार, विरोधकांवर केलेल्या कुरघोड्या, स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी केलेली कटकारस्थाने यांची कोणतीही लिखित नोंद नसेल, एवढे प्रसंग जनतेलाच ठाऊक असतील.