हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला कृषी महाविद्यालयात चाकरी

कोल्हापूर – आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे १६ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणी यांना त्यांच्या भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले. हे दृश्य सर्वांचे मन हेलावणारे होते.

त्याच वेळी ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोशनजी शमनजी कृषी महाविद्यालयात कु. कल्याणी यांना चाकरी देण्याच्या निर्णय महाविद्यालयाचे अध्यक्ष रियाज शमनजी यांनी घेतला. यानंतर १७ नोव्हेंबर या दिवशी शालेय शिक्षणमंत्री उदय सामंत हे हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्या हस्ते कु. कल्याणी यांना चाकरीचे पत्र देण्यात आले. या वेळी रियाज शमनजी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.