बनवेगिरी करणार्‍यांनी ३ सहस्र जणांची आर्थिक हानी केली !

अज्ञानी जनतेला फसवणार्‍या अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा हवी ! अशा गुन्हेगारांपासून सावध रहाण्यासाठी शासनानेही मोठ्या प्रमाणात जागृती केली पाहिजे !

नागपूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील विजय गुरनुले आणि अविनाश महादुले या मावसभावांनी दळणवळण बंदीच्या काळात ‘मेट्रो रिजन ट्रेडिंग कंपनी’ या आस्थापनाच्या नावाखाली ३ सहस्र लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. ‘चेनमार्केटिंग’ माध्यमातून आठवड्याला ५ सहस्र ५०० रुपये मिळकतीचे आमीष दाखवणारा अविनाश महादुले याला अटक करण्यात आली आहे.