छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार
संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.
छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !
औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’
डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !
‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
गुढीपाडवा साजरा करू न देण्याचा हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे यांचा फसवा प्रयत्न !
हिंदूंचा नववर्षारंभ हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.
रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर धारकर्यांकडून सामूहिक मुंडण !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत १ मास गोड पदार्थ न खाणे, १ वेळचे भोजन, तसेच आवडणारे पदार्थ व्यर्ज करतात.
शिवप्रेमींनी १० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे श्री शिवप्रतिष्ठानचे आवाहन !’
या महिन्याभरात गोड-धोड न खाणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, पायात चप्पल न घालणे, चहा-कॉफी न पिणे, पान-तंबाखू न खाणे, दूरदर्शन वा चित्रपट न पहाणे, दिवसभरात एक वेळचे जेवण करणे, कोणतीही नवीन खरेदी न करणे अशी बंधने स्वतःवर घालून घेत ते श्रद्धेने पाळले जाते.