छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन
१६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.
रत्नागिरीत ४ फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि ५ फेब्रुवारीला श्री विठ्ठलमूर्ती यांचे होणार अनावरण
थिबा पॅलेस परिसरातील जिजामाता उद्यानात राज्यातील सर्वांत उंच ५६ फुटी उंच पुतळा उभारण्यात आला आहे. यावर अनुमाने दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला विरोध करणार्या जिहादींना योग्य प्रत्युत्तर देऊ ! – नितेश राणे
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळालेले नाही. या बोर्डामधील जिहादी विचारसरणी असणारा एक अधिकारी या प्रक्रियेत अडथळा आणत आहे.
Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !
पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे महापालिकेत निवेदन
पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असतांना त्याचे लोर्कापण करण्यात आले. या संदर्भात महापालिकेने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी हे काम अद्याप अपूर्ण असून उद्घाटन अयोग्य असल्याचे पत्र प्रकाशित केले होते.
सातारा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
संपूर्ण देशाला सार्थ अभिमान वाटेल, असे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचीती येईल, तसेच देश-विदेशांतील पर्यटकही आकर्षित होतील.
औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !
औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.
स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करावा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करतांना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्य स्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. हुतात्मा राजगुरु यांचे राजगुरुनगर येथील स्मारकही भव्य आणि प्रेरणादायी होईल, असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सातारा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप
ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही, याची उणीव भासत होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाच्या वतीने या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी संमत झाला आहे