धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने…


बुद्धीवंत तू, ज्ञानवंत तू, कीर्तीवंत तू, धीरोदात्त तू ।
मोजून दिस चाळीस, दुष्ट यवन सैतानी ।
पिशाच्च योनी धारी औरंग्याचा छळ सहन केलास तू ।
कोणत्या मुशीतून तू जन्मलास हे राजा ।
शिवशंभू, छळ तू धीरोदात्तपणे सोसलास ।
परि छळ तुझा नुसता ऐकून आम्ही जागीच थिजलो ।
असंख्य अविरत मरणप्राय वेदना ।
तोंडातून ‘ब्र’ही न काढता तू सोसल्यास ।
तुझ्या धीरोदात्तपणाला तो पाताळयंत्री औरंग्याही मुजरा करता झाला ।
शरमेने लज्जित होऊन डोके भूमीत खुपसून ढसढसा रडला ।
रडता रडता हमसून हमसून म्हणू लागला ।
‘हाय अल्ला परवरदिगार, ये क्या कर डाला ।
मरकर भी ये राजा संभाजी अमर हो गया ।
मौत राजा संभाजीकी हुई, फिर हमे क्यू रुलवाया ।
हे अल्ला, फिर हमे क्यू रुलवाया’ ।
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (२८.२.२०२५)
कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !
लैंगिक आरोग्य आणि स्त्री
वारकरी संप्रदाय
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
भावना बोथट झाल्या ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?