
कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – २८ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कोल्हापूर शहर विभागातील धारकरी बांधव यांनी २८ फेब्रुवारीला पंचगंगा नदीच्या संगम प्रयाग-चिखली येथे सामूहिक मुंडण केले. प्रारंभी सामूहिक ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी लिहिलेल्या श्री संभाजी सूर्यहृदयचे श्लोक पठण करून महाराजांना वंदन करण्यात आले.
धर्मवीर बलीदानमासाच्या निमित्ताने धारकरी सामूहिक मुंडण, पायांत चप्पल न घालणे, १ मास गोड न खाणे, १ वेळ जेवणे यांसह अन्य गोष्टी पाळतात. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री अवधूत चौगुले, आशिष पाटील, रोहित अतिग्रे, आदित्य जासूद, तनय मोरे, गणेश बीबडकर यांसह १०० हून अधिक धारकरी उपस्थित होते.
सांगली – सांगलीतील धारकर्यांनी कृष्णा घाटावर सामूहिक मुंडण केले. सांगली शहरात ठिकठिकाणी बलीदानमासाच्या निमित्ताने प्रतिदिन सायंकाळी एका ठराविक वेळेस सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होत आहे.
संपादकीय भूमिकाबलीदानमासाच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्माभिमानाचा आदर्श कृतीत आणूया ! |