राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार म्हणतात, ‘‘संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ करण्यात आला, तो मनुस्मृतीतील शिकवणीनुसार करण्यात आला. मनुस्मृतीनुसार छळ करण्याची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हे पहाण्याची आवश्यकता आहे.’’ या रोहित पवार यांचे हिंदुविरोधी जिहादीप्रेम समजून घेण्यासाठी ऐतिहासिक वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे.
१. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या शरीयतनुसार आणि त्याचा पुरावा
औरंगजेबाने मुल्ला-मौलवींच्या (इस्लामचे धार्मिक नेते आणि अभ्यासक यांच्या) सल्ल्यानुसार ‘छत्रपती संभाजी महाराज यांना इस्लामी शरीयतनुसार प्रचंड यातना देऊन हत्या केली’, हे निर्विवाद वास्तव आहे. मुल्ला-मौलवींचा तो सल्ला ‘मआसिर-ई आलमगिरी’, या ग्रंथात नोंदवलेला आहे आणि तो पुढीलप्रमाणे आहे –
‘इस्लामी शहरे लुटून (नहब व गारत-ई-बिलाद-ई-इस्लाम) आणि मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून (कत्ल व इसर-ई मुस्लमानान) जे पाप या घाणेरड्या धर्माच्या (म्हणजे हिंदु धर्माच्या) आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे, अशा या काफिराने (म्हणजे संभाजी महाराज – या सर्व शिव्या मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या आहेत) केले होते, ते बघता त्याला जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला. शरीयतवर (इस्लामी कायदा) आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर आणि इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला (काती उल तरीक) नरकात धाडणेच योग्य होईल, असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल-अव्वल जुलूस ३२ ला बादशाह कोरेगावला (ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते) आल्यावर त्याला (म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना) कवी कलश यांच्यासमवेत काफिरांना ठार मारणार्या तलवारीच्या साहाय्याने सर्वांत खोल अशा नरकात धाडले.’ इतकेच नाही, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा दिनांक ‘काफिर बच्चा जहन्नमी रफ्त’, म्हणजे ‘नरकनशिबी काफिराचा मुलगा नरकात गेला’, या कालश्लेषाच्या साहाय्याने लिहिली गेली.
२. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाविषयी जातीयवादी अपप्रचार म्हणजे आत्मबलीदानाची विटंबनाच !
या वस्तूस्थितीमुळे जिहादी इस्लाम उघडा पडतो आणि हिंदु समाज जागरूक होतो. ‘हिंदु समाज जागरूक झाला, तर आपल्या जातीयवादी दुकानाला कुलूप लागेल’, हे रोहित पवार यांना चांगलेच माहिती आहे. ती मनुस्मृती काय आहे ?, कशी आहे ?’, याविषयी आज आम्हाला काहीही देण-घेणे नाही.
या रोहित पवार यांची पात्रता काय ? त्यांची एकमेव ओळख काय ? तर ते शरद पवारचे नातू आहेत. रोहित हे जर शरद पवारचे नातू नसते, तर त्यांना कारकून म्हणूनही कुणी कामाला ठेवले नसते. रोहित पवार यांच्यासारखे जातीयवादी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाविषयी असा अपप्रचार करून त्या राजहुतात्म्याच्या आत्मबलीदानाची विटंबना करत आहेत. आजही जे औरंग्याचे पाईक आहेत, त्यांच्या लांगूनचालनासाठी त्या सूर्यासारख्या तेजस्वी शिवपुत्राची अवहेलना करत आहेत. आपल्या जातीयवादी राजकारणासाठी छत्रपती शिवाजी राजे आणि शंभूराजे यांचे शौर्य अन् त्याग यांची विटंबना करणार्या जातीयवादी रोहित पवार यांना हिंदू योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देतील.
– श्री. भरत आमदापुरे, अभियंता, पुणे. (२.३.२०२४)
संपादकीय भूमिकाजातीयवाद पसरवणारे आणि जनतेच्या भावनिक सूत्रांचे भांडवल करून राजकारण करणारे लोकप्रतिनिधी भारतीय लोकशाहीत असणे दुर्दैवी ! |