छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट करणारा धर्मांध कह्यात !

गुन्हा नोंद

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ निंदनीय पोस्ट केल्याप्रकरणी अनस कुरेशी या धर्मांधाविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे. या प्रकरणी लालबाग – परळ परिसरातील हिंदूंनी हा प्रकार उघड करत धर्मांधावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

१. आरोपी अनस कुरेशीने त्याच्या ‘व्हॉट्सॲप पोस्ट’मध्ये औरंगजेबाचे छायाचित्र प्रसारित करत लिहिले, ‘‘हबीबी…जो हमे हरा नहीं पाए मैदान-ए-जंग में और वो हमसे बदला ले रहें है मैदान ए सिनेमा हॉल में ।’’ (अर्थ – प्रिय, जे आम्हाला मैदाना हरवू शकले नाहीत, ते आमच्याशी चित्रपटगृहाच्या मैदानात बदला घेत आहेत.) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केले.

२. आरोपी लालबागमधील मेहता मेशन इमारतीमधील भ्रमणभाष आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात विक्रेता (सेल्समन) म्हणून नोकरीस असल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली.

३. हिंदूंच्या मागणीनुसार पोलिसांनी आरोपीला भ्रमणभाषवरून क्षमा मागायला लावली. त्याने तसे केले; पण हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘समोर येऊन क्षमा मागावी’, असे सांगत प्रकरण लावून धरले. त्यानंतर पोलिसांनी कुरेशीला कह्यात घेतले. (हिंदूंनी तगादा लावला नसता, तर पोलिसांनी आरोपीला अटक केली असती का ?, हा प्रश्नच आहे ! – संपादक)

४. या आंदोलनाचे नेतृत्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सर्वश्री रवींद्र दाभोलकर, गिरीश भोसले, श्रीपाद सावंत, अक्षय नाईक, सागर भाकरे, रोहित ठाकूर, सागर म्हात्रे, राहुल लोध, प्रणव सिंह, रोहित कांबळे, रोहित सिंह, इंद्रजित तिवारी आणि अधिवक्ता भूमकर यांनी केले.

संपादकीय भूमिका

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची कठोर शिक्षाच द्यायला हवी !