निपाणी (कर्नाटक) – अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणीचे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, ‘सद्गुरु त्वायक्वांदो स्पोर्टस् ॲकॅडमी’चे संस्थापक श्री. बबन निर्मळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेश आवटे, धर्मप्रेमी श्री. अभिनंदन भोसले, सर्वश्री संतोष माने, विशाल जाधव, संतोष देवडकर, आतिश चव्हाण, अक्षय वाघेला, प्रणव जासूद, विश्वनाथ भाट, अजित पाटील, राजू कोपार्डे यांसह अन्य उपस्थित होते.
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – याच मागणीचे निवेदन हुपरी नगर परिषद येथे प्रशांत तराळ यांना देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री महादेव आडावरकर, अविनाश बागल, नितीन काकडे, सचिन माळी, मंगेश खांडेकर, नितीन खेमलापुरे, प्रसाद देसाई, पद्मराज इंग्रोळे यांसह अन्य उपस्थित होते.