‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पाली (रायगड) पोलीस निरीक्षकांना निवेदन !

निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री शिवराज पाटील, विशाल देशमुख, रोशन खंडागळे, नरेश खंडागळे, मंगेश गिरी आणि राजेंद्र पावसकर

पाली (रायगड) – अभिनेता आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान याचा ‘महाराज’ हा पहिला चित्रपट १४ जून या दिवशी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात) मंचावर प्रदर्शित होणार होता; पण आता न्यायालयाने त्याला स्थगिती आदेश दिला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात तात्काळ बंदी आणावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून भारत सरकारला देण्यासाठी पालीच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.