बॉलीवूड आणि ‘ओटीटी’ यांच्या माध्यमातून वाढत्या अश्लीलतेला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानात आलेले अनुभव अन् त्याला मिळालेला प्रतिसाद

(टीप : ओटीटी म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’. ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाणे)

‘ओटीटी ॲप्स’

१. बॉलीवूडचा छुपा अजेंडा

भारतीय चित्रपट निर्मितीचे जनक दादासाहेब फाळके यांनी एक चित्रपट बघितला होता ‘द लाईफ ऑफ ख्राईस्ट’. त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की, ‘जर ‘जीजस’वर फिल्म बनवली जाऊ शकते, तर मग आपल्या देवीदेवतांवर, आपल्या ऐतिहासिक घटनांवर चित्रपट का बनवू शकत नाही ?’ त्यानुसार भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये वर्ष १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट बनवला गेला; पण वर्ष १९४७ नंतर चित्रपटांचे संपूर्ण स्वरूप पालटून गेले. साम्यवादी, लाहोरवरून आलेले काही समूह (ग्रुप) यांनी संपूर्ण चित्रपटांची ‘थीम’च (विषय) पालटली. स्वतंत्र भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता, तर मोघल-ए-आझम ! बहुसंख्य हिंदूंच्या भारत देशात स्वातंत्र्यानंतरचा पहिला रंगीत चित्रपट मोघल-ए-आझम ! यावरूनच बॉलीवूडचा छुपा ‘अजेंडा’ (कार्यसूची) दिसून येतो.

२. ओटीटी आणि बॉलीवूड यांनी काय दिले ?

प्रतीकात्मक छायाचित्र

या बॉलीवूड आणि ओटीटी यांनी आजवर आपल्याला काय दिले ?

२ अ. हिंदु धर्म, देवीदेवता यांची टिंगलटवाळी करायला कुणी प्रारंभ केला, तर बॉलीवूडने !

२ आ. टिळा लावलेला व्यक्ती आणि भगव्या कपड्यातील व्यक्ती गुंड, व्यभिचारी अन् अत्याचारी असल्याचे दाखवायला प्रारंभ कुणी केला, तर बॉलीवूडने !

२ इ. दीर-वहिनी, जावई-सासू, सून-सासरा, मुलगा-सावत्र आई, शिक्षिका-विद्यार्थी, डॉक्टर-रुग्ण अशा विविध नात्यांना काळीमा फासण्याचे काम कुणी केले ?, तर याच बॉलीवूड आणि ‘ओटीटी’ने !

२ ई. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता तरुण-तरुणींनी एकत्र रहाणे, हे कुणी दाखवले ? बॉलीवूड !

२ उ. ‘मी टू’ (लैंगिक शोषणाच्या विरोधात तरुणींनी चालू केलेली चळवळ) चा प्रारंभ कुठून झाला, तर ‘बॉलीवूड’पासून !

२ ऊ. ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन, पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण हीसुद्धा बॉलीवूडची देणगी आहे.

२ ए. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ चालू झाले तेव्हापासून ७०० ‘ॲप्स’ चालू झाले आहेत. देहली, मेरठ येथे मुख्य केंद्र करून मुलींना ‘हायर’ (कंत्राटी पद्धतीने कामावर घेणे) करून प्रतिदिन ३० अश्लील फिल्म प्रसारित केल्या जात आहेत. एवढी गंभीर परिस्थिती आहे.

हे सगळ करणारे काही विदेशी, साम्यवादी, देशविरोधी आहेत; पण हे सगळे आपल्या मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहे.

३. ओटीटी आणि बॉलीवूड यांचे दुष्परिणाम

प्रतीकात्मक छायाचित्र

अश्लील वेब सिरीजमुळे मुली-महिला यांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचार वाढला आहे. युवा पिढी अमली पदार्थ, हिंसाचार, हत्या यांसाठी उत्तेजित होत आहेत. काही मासांपूर्वी एका शाळेच्या प्राचार्याने ६ मुलींवर अत्याचार केले. एका ५ वर्षांच्या मुलीवर १० आणि १२ वर्षांच्या मुलांनी बलात्कार केला. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘आम्ही ‘व्हिडिओ’ बघून उत्तेजित झालो.’ एका भावाने आपल्या लहान बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या केली, तेव्हा त्यानेही तशाच प्रकारचे ‘विधान’ केले. आज बाग, कॅफे, मेट्रो अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी विचित्र अवस्थांमध्ये युवा पिढी आढळते.

४. अश्लीलताविरोधी कार्य, प्रतिसाद आणि यश

श्री. हर्षद खानविलकर

हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून अश्लीलतेच्या विरोधात कार्य करत आहे – मग ते गोव्यातील अश्लील होर्डिंग काढण्याचे असू दे किंवा सनी लिऑनच्या विरोधात भारतातील पहिली प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट (दाखल) करण्यासंदर्भात असू दे ! समिती संस्कृतीहननाच्या विरोधात नेहमीच कार्यरत असते.

ओटीटी आणि बॉलीवूड यांमधील अश्लीलतेच्या विरोधात ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’ (संस्कृती वाचवा भारत वाचवा !)चे संस्थापक श्री. उदय माहूरकर यांनी मोहीम चालू केली आहे. ‘ही मोहीम तळागाळात पोचावी, तसेच मुंबई हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र आहे, तर अशा महत्त्वाच्या विषयावर मुंबईमध्ये मोहीम व्हावी’, हा उद्देश ठेवून ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’, ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सेवा न्याय उत्थान’ यांनी एकत्र येऊन २५ फेब्रुवारी २०२४ ला मुंबई येथे कार्यक्रम घेतला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) अधिकारी, सामाजिक माध्यमांमधून जागृती करणारे प्रतिनिधी (सोशल मिडिया इनफ्यूएन्सर्स), तसेच पालक-युवा वर्गही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होता. या मोहिमेची सर्वांनीच पुष्कळ प्रशंसा केली आणि सर्वतोपरी साहाय्य करण्याचे अन् मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमानंतर २० दिवसांमध्येच चांगली बातमी मिळाली की, सरकारने १८ अश्लील ‘ओटीटी प्लॅटफॉर्मस्’वर संपूर्ण भारतभरात बंदी घातली, तसेच या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ला साहाय्य करणारी १९ संकेतस्थळे, १० ‘ॲपस्’, ५७ सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया हँडलस्) यांवरही बंदी घातली. हे यश एका कार्यक्रमानंतर मिळाले आहे.

याखेरीज चित्रपट निर्माती एकता कपूर यांच्या ‘अल्ट बालाजी’च्या एका वेब सिरीजमध्ये ‘एक हिंदु पुरुष ज्याचे स्वागत पूजेची थाळी घेऊन करतात, तो त्या घरातील आजी, आई, वहिनी आणि बहीण यांच्यासोबत संबंध ठेवतो’, असे दाखवले होते. हे दृश्यही त्या वेब सिरीजमधून ‘डिलीट’ करण्यास (काढण्यास) भाग पाडले.

५. पुढील दिशा

आज आपण पहातो की, साम्यवदी लोक शाळा-महाविद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) करत आहेत. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जेव्हा मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य यांना भेटलो, तेव्हा सर्वांचा पुष्कळच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आम्हाला ‘आम्ही तुम्हाला हा विषय महाविद्यालयात मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा विषय आपण विद्यापीठस्तरापर्यंत घेऊन जाऊ, तसेच याविषयी एखादा अभ्यासक्रम किंवा ‘लेक्चर’ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू’, असेही सांगितले.

सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ही एक चांगली संधी आहे की, या माध्यमातून आपण महाविद्यालयात जाऊन युवकांचे संघटन करू शकतो, त्यांना हळूहळू राष्ट्र-धर्माच्या कार्यात जोडून घेऊ शकतो. हा विषय पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आपण एक शिष्टमंडळ सिद्ध केले आहे, जी या विषयाला अनुसरून अभ्यासक्रम सिद्ध करील आणि ते विषय घेऊन महाविद्यालयांत जाऊन जागृती अन् युवकांचे संघटन करील. या मोहिमेत जे सहभागी होऊ इच्छितात किंवा ही मोहीम आपल्या क्षेत्रात राबवू इच्छितात, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अथवा आपल्या क्षेत्रातील स्थानिक समितीसेवकांशी संपर्क साधावा.

६. समारोप

शेवटी सर्वांना एवढेच सांगायचे आहे की, आज भ्रमणभाष संच, टीव्ही ‘स्मार्ट’ झाले; पण ते बघणारे‘स्मार्ट’ (हुशार) झाले का ? आपली आजची युवा पिढी ‘स्मार्ट’’ झाली का ? आपणही आता ‘स्मार्ट’ व्हायला पाहिजे. काय बघायचे आणि काय नाही बघायचे, हे ठरवायला हवे, यासंदर्भात  प्रबोधन करायला हवे. आज तरुणांसमोर आदर्श  कुणाचे ठेवले जातात ?, तर अभिनेते शाहरुख  खान, सलमान खान, आमीर खान ! हे आमच्या युवा पुढीचे आदर्श !! पण आमचे आदर्श कोण असले पाहिजेत, तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, मातृभूमीसाठी स्वत:चे बलीदान करणारे क्रांतीकारक, कारगिलच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याची धूळधाण उडवणारे परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा, हे आदर्श युवांसमोर असले पाहिजेत.

आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी  संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– श्री. हर्षद  खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.