(म्हणे) ‘मत दिले नाही, तर पाणी आणि वीज मिळणार नाही !’  

बंगालमधील मंत्री अशा प्रकारची धमकी देतात, याचा अर्थ तेथे तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही आहे ! याविरोधात लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते असणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पक्ष, संघटना, बुद्धीवादी तोंड उघडत नाहीत !

(म्हणे) ‘आकाशवाणीवरून सनातनी विचारांचा प्रसार केला जातो !’ – डॉ. बाबा आढाव

‘नासा’सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सनातन ग्रंथांचा आधार घेऊन संशोधन करत असतांना सनातन धर्माच्या ग्रंथांना अवैज्ञानिक म्हणणे हास्यास्पद ! किंबहुना गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, स्थापत्य, पर्यावरण आदी सर्वच शास्त्रांचे मूळ सनातन धर्मात आहे !

पाकमधील लोकशाही सुनियोजित पद्धतीने नष्ट केली जात आहे ! – पाकचे सर्वोच्च न्यायालय

पाकमध्ये प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, अशी कठोर टीका पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काझी फीज ईसा यांनी केली.

केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !

पेरीड (जिल्हा कोल्हापूर) गावात ग्रामपंचायतीसाठी शून्य टक्के मतदान !

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे गावात निवडणूक झालेली नाही. यंदा ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. यामुळे बिनविरोध परंपरा मोडीत निघणार म्हणून गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.

संभाजीनगर येथे बनावट मतदान करण्यासाठी आलेले तिघे जण पोलिसांच्या कह्यात

मयत भास्कर जयाजी ढोले (वय ६२ वर्षे) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आली होती. त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्र होते. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !

लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनीअंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक !

भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता हे ४ आधारस्तंभ आहेत. अलीकडे काही घटना पाहिल्या, तर हे चारही आधारस्तंभ निखळतात कि काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

‘अलीबाबा’ लुटणारे ‘चिनी’ चोर !

‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’च्या कथेचा आस्वाद आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी घेतला असेल. आता ‘अलीबाबा आणि ‘चिनी’ चोरा’च्या कथेला आरंभ झाला आहे. या कथेचाही राष्ट्रप्रेमी भारतियांनी आस्वाद घ्यावा; कारण वेळ, शक्ती, पैसा न वापरता शत्रूचे स्वतःच्या कर्माने अधःपतन होत असेल, तर ते कुणाला नको आहे ?