व्यक्तीचे जीवन समृद्ध करण्यासाठी सनातनी विचार अंगीकारण्याची आवश्यकता असतांना कामगार नेते बाबा आढाव यांची मुक्ताफळे !
|
पुणे – आकाशवाणी हे शासकीय माध्यम आहे. या माध्यमाद्वारे प्रतिदिनच्या जगण्याला पूरक असलेले राज्यघटनेतील विचार घराघरांत पोचवणे आवश्यक आहे; पण सध्याची राजकीय व्यवस्था ते होऊ देत नाही. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या ‘चिंतन’ या कार्यक्रमाद्वारे सनातनी विचार पोचवले जात असून, जाणूनबुजून अवैज्ञानिक विचार लोकांपर्यंत पोचवले जात आहेत. मनुवादी विषमतेवर आधारित व्यवस्था संपवण्यासाठी आपण भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला आहे; पण राज्यघटना केवळ पुस्तकातच राहिली आहे, अशी हिंदुद्वेषी टीका कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी केली. न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढावhttps://t.co/hKOsrey0xn#BabaAdhav #Pune #PBSawant
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
या वेळी डॉ. विमलकीर्ती, जमात-ए-इस्लामीचे सय्यद अश्रफी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर कांबळे, निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ, श्रीमंत कोकाटे, शेतकरी आंदोलनाचे नेते सज्जन कुमार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,
१. राज्यघटनेने स्वीकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा या मूल्यांचे चिंतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे; मात्र आकाशवाणीवर पहाटे ऐकवल्या जाणार्या ‘चिंतन’ या कार्यक्रमातून सनातनी व्यवस्थेचा जाणीवपूर्वक प्रचार केला जातो. देवाची स्तुती, पौराणिक कथा, अवैज्ञानिक विचार आदी समाजाला मागे नेणारे विचार ऐकवले जातात.
२. भारतीय समाज दुहेरी व्यवस्थेत जगतो. दैनंदिन आणि सामाजिक जीवनात तो चातुर्वर्ण्यावर आधारित मनूची व्यवस्था जगत असतो; तर कायदे, नियम यांसाठी राज्यघटनेवर आधारलेली व्यवस्था त्याला लागू होते; मात्र मनुवादी व्यवस्था आणि राज्यघटना एकाच वेळी एकत्र वाटचाल करू शकत नाहीत.