राज्यात पात्र १०२ टक्के जनतेने कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा, तर ४२ टक्के जनतेने दुसरी मात्रा घेतली आहे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १० पैकी ९ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा (डोस) घेतली नव्हती, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केले. 

कोरोना उपचारासाठी ‘अणु तेल’ हे आयुर्वेदाचे औषध प्रभावी ! – नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड

हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांवर लाखो रुपयांचा खर्च !

महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता.

गोव्यात कोरोना लसीची पहिली मात्रा घेण्याचे प्रमाण १०० टक्के नसल्याचे उघड !

१२ सप्टेंबरला १ सहस्र ५२ जणांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा

ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात अथर्वशीर्ष पठण !

कोरोनाच्या संसर्गामुळे ५ महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अल्प !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम्.आर्.चे) माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांचा दावा

जनतेला जागरूक करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेच्या मनातील असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते. ‘आज आपण सर्वांनी, तसेच विविध मंडळे, संस्था यांनीही कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी; म्हणून प्रयत्न करायला हवेत

 गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

आजपर्यंत प्रशासनाने अन्य धर्मियांच्या किती मिरवणुकांवर कोरोनाविषयक नियम मोडल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत ?

हिंदूंच्या सणांविषयी प्रशासन आणि न्याययंत्रणा यांनी केलेला पक्षपातीपणा !

सर्व ‘कायदे केवळ हिंदूंसाठी आणि फायदे (लाभ) मात्र अल्पसंख्याकांसाठी’, अशी स्थिती दिसून येत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या प्रमाणपत्रावर होणार उल्लेख !

संपूर्ण देशात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या लोकांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर याची नोंद केली जाणार आहे. भारत सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर झाल्यावर १० दिवसांनी सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.