उत्तरप्रदेशातील देवबंद गावात एटीएसचे कमांडो प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय !

देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून दोघांना अटक !

आतंकवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे आंतरराष्ट्रीय संपर्क केंद्र चालू होते का, या दृष्टीने पडताळणी केली जात आहे.

सातारा येथे आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईत ४ तलवारींसह ११ शस्त्रे कह्यात !

पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.

उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना अटक !

शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !

म्यानमारमधून भारतात मानव आणि सोने यांची तस्करी करणार्‍या टोळीतील ४ रोहिंग्यांना अटक

देशातील घुसखोर रोहिंग्या गुन्हेगारी कारवायाही करू लागले आहेत. याचीच आतापर्यंत भीती होती. आतातरी सरकार त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावण्यासाठी कृतीशील होईल का ?

मालदा (बंगाल) येथील बांगलादेश सीमेवरून चिनी गुप्तहेराला अटक  

अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

बांका (बिहार) येथील स्फोट देशी बॉम्बचाच असल्याचे उघड !

हा बॉम्ब तेथेच एका कंटेनरमध्ये ठेवला होता. तो फुटल्यानंतर मौलाना अब्दुल मोबीन यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. हा मदरसा अनधिकृत होता, असेही उघड झाले आहे.

मुंबईत युरेनियम सापडल्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग !

अणुबॉम्ब किंवा अन्य स्फोटके सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार्‍या युरेनियमच्या स्फोटकांचा साठा सापडल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे.