सातारा येथे आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईत ४ तलवारींसह ११ शस्त्रे कह्यात !

आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईत ४ तलवारींसह ११ शस्त्रे कह्यात

सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – शहरामध्ये आतंकवादविरोधी पथक गस्त घालत असतांना त्यांना आकशवाणी झोपडपट्टीमधील एक जण संशयास्पद वावरतांना आढळून आला. त्याला कह्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे ४ तलवारी आणि विविध प्रकारची ११ धारदार शस्त्रे मिळाली. या शस्त्रांची किंमत १८ सहस्र ५०० रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.