खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला करकरे यांनी त्रास दिला, असे विधान येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. या विधानाविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

१. यात साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, देशात एक आणीबाणी वर्ष १९७५ मध्ये  लावण्यात आली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणीबाणी वर्ष २००८ मध्ये लावण्यात आली. मला मालेगाव प्रकरणात गोवण्यात आले.

२. मला शिक्षण देणार्‍या आचार्यांच्या हाताची बोटे हेमंत करकरे यांनी तोडली होती, असा आरोपही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.

३. ‘माझ्या शापामुळेच हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला’, असे विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी काही वर्षांपूर्वी केले होते.