उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना अटक !

  • कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथे करण्यात आले धर्मांतर !

  • पाकिस्तानची आय.एस्.आय. संघटना करत होती साहाय्य !

  • भारतीय सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना ! शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !
  • हिंदूबहुल देशात आजपर्यंत लाखो हिंदूंचे धर्मांतर होऊनही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत आजपर्यंतच्या एकाही शासनकर्त्याने केवळ धर्मांधांच्या अनुनयामुळे राष्ट्रीय पातळीवर धर्मांतरविरोधी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या ! यावरून त्यांना पीडित हिंदूंची नव्हे, तर धर्मांतर करणार्‍या धर्मांधांची आणि त्यांच्या मतांची अधिक काळजी आहे, हेच स्पष्ट होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे ! त्यासाठी सर्व धार्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन पुढाकार घेतला पाहिजे !
  • आता हिंदूंच्या संघटनांनी या धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
जहांगीर आणि उमर गौतम

लक्ष्मणपुरी (लखनौ) – ‘प्रेरक विचार’ अर्थात् ‘मोटिवेशनल थॉट’च्या गोंडस नावाखाली गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथून अटक केली. जहांगीर आणि उमर गौतम अशी त्यांची नावे असून ते ‘दावा इस्लामिक सेंटर’ नावाची संस्था चालवतात. आतंकवादविरोधी पथक गेल्या ४ दिवसांपासून त्यांची चौकशी करत होते. कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले अन् स्त्रिया यांचे त्यांनी धर्मांतर केले आहे.

आंतकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण गरीब हिंदूंना लक्ष्य करायचे. त्यांनी आतापर्यंत अनुमाने १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले असून त्यामध्ये मोठ्या संख्येने मूकबधिर आणि महिला यांचा समावेश आहे. रामपूरमधील एका गावात दोन हिंदु मुलांची बलपूर्वक सुंता करून त्यांचे धर्मांतर करण्यामध्ये एक मौलानाचा हात असल्याचे समोर आले आहे. त्यांना विदेशात कार्यरत असलेली एक मुसलमान संघटनाही आर्थिक साहाय्य करत असल्याचे समोर आले असून पोलीस त्यांची माहिती घेत आहेत.

सौजन्य : IndiaTV

डासना मंदिराच्या पुजार्‍यावरील आक्रमणाच्या घटनेमुळे उघड झाले प्रकरण !

याचा अर्थ जर ही घटना घडली नसती, तर पोलिसांना या मौलानांची कृत्ये कधीही कळली नसती ! यास उत्तरदायी असलेल्या निद्रिस्त पोलिसांना सेवामुक्त करून घरचा रस्ता दाखवा !

३ जून या दिवशी दोघा धर्मांध तरुणांनी देहलीतील डासना मंदिरातील एका पुजार्‍यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही पकडून त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना मौलाना उमर आणि जहांगीर यांच्याविषयी माहिती मिळाली. दोघा मौलानांनी ‘नोएडा डेफ सोसायटी’तील मूक-बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले. धर्मांतर झालेल्या महिला आणि मुले यांची सूचीच पोलिसांच्या हाती लागली आहे.