मुंबईत युरेनियम सापडल्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग !

मुंबई – अणुबॉम्ब किंवा अन्य स्फोटके सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार्‍या युरेनियमच्या स्फोटकांचा साठा सापडल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे. ५ मे या दिवशी आतंकवादविरोधी पथकाने मानखुर्द येथे ७ किलो वजनाचा २१ कोटी रुपयांचा ‘युरेनियम’चा साठा पकडला. याप्रकरणी जिगर पांड्या आणि अबू ताहीर या दोघांना अटक करण्यात आले आहे.