विमानांमध्ये बाँब ठेवल्याच्या अफवा पसरवणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून आपल्या देशाविरुद्ध एक नवीन प्रकारचा आतंकवाद चालू झाला आहे. भारतीय विमान आस्थापनांमध्ये अफवा पसरवली जात आहे की, विमानामध्ये किंवा विमानतळांवर बाँब ठेवले आहेत. त्यामुळे विमान आस्थापन, विमानतळे आणि भारत यांची मोठी हानी होत आहे. विमानाचे एक उड्डाण रहित झाले, तर दीड ते दोन कोटी रुपये जादा व्यय येतो. आंतरराष्ट्रीय उड्डाण असेल, तर हाच व्यय ५ ते ६ कोटी रुपये येतो. आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे या बाँबविषयी अफवा पसरवणार्‍या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.