Blast At Karachi Airport : कराची विमानतळाबाहेरील बाँबस्‍फोटात २ चिनी कर्मचारी ठार

बलुच लिबरेशन आर्मीने घेतले बाँबस्‍फोटाचे दायित्‍व !

कराची विमानतळाबाहेर बाँबस्‍फोट

कराची (पाकिस्‍तान) – येथील आंतरराष्‍ट्रीय विमानतळाबाहेर ६ ऑक्‍टोबरच्‍या रात्री झालेल्‍या भीषण बाँबस्‍फोटात २ चिनी कामगार ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले आहेत. या स्‍फोटात अनेक वाहनांची हानी झाली. ‘पोर्ट कासिम इलेक्‍ट्रिक पॉवर कंपनी (प्रायव्‍हेट) लिमिटेड’च्‍या चिनी कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या वाहन ताफ्‍यावर रात्री ११ वाजण्‍याच्‍या सुमारास हे आक्रमण करण्‍यात आले, अशी माहिती चिनी दूतावासाने दिले आहे. या स्‍फोटात पाकचे काही सैनिकही ठार झाल्‍याचे म्‍हटले आहे.

प्राथमिक अहवालात चिनी नागरिकांना लक्ष्य करून स्‍फोट घडवण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले. पाकिस्‍तानी अधिकार्‍यांनी प्रारंभी हा ऑईल टँकरचा स्‍फोट असल्‍याचे सांगितले; पण बलुच लिबरेशन आर्मीने या बाँबस्‍फोटाचे दायित्‍व स्‍वीकारले. त्‍यांच्‍या एका सदस्‍याने आत्‍मघाती स्‍फोट घडवून आणाल्‍याचे सांगितले.