Flight Bomb Threats In India : देशात एकाच दिवसात ९५ विमानांना बाँबने उडवण्याची धमकी

सुरक्षायंत्रणा सतर्क !

नवी देहली – देशभरातील ९५ विमानांना बाँबने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये २० एअर इंडिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा यांच्या विमानांचा समावेश आहे. याखेरीज ‘स्पाइसजेट’च्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी देहली पोलिसांनी ९० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमकावल्याच्या प्रकरणी ८ स्वतंत्र गुन्हे नोंदवले होते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, हे धमकीचे संदेश ‘एक्स’वर  आले होते. पोलिसांनी ‘एक्स’कडून धमकी देणार्‍या खात्याची माहिती मागितली आहे.

एका आठवड्यापेक्षा अल्प कालावधीत २५० हून अधिक विमानांना बाँबने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ‘सायबर सेल’ आणि देहली पोलीस या धमक्यांची चौकशी करत आहेत.


हे ही वाचा → संपादकीय : विमानात बाँब : भारतद्वेषी षड्यंत्र !