Gold Smuggling Pakistani Terriorists : पाकच्या आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांवरून भारतात सोन्याची तस्करी !

पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांचा सोन्याची तस्करीसाठी वापर आणि यातील मिळकतीचा देशभरात भारतविरोधी कारवायांसाठी होतो वापर !

Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

MIG-29 Accident : दाबोली (गोवा) धावपट्टीवर ‘मिग २९’ विमानाचा टायर फुटला

ही घटना २६ डिसेंबरला घडली. त्यानंतर २ घंटे दाबोली विमानतळावर उतरणारी विमाने मोपा विमानतळाकडे वळवावी लागली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वायूदलाची विमाने म्हणजे उडत्या शवपेट्या !

तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकाऊ वैमानिक यांचा मृत्यू झाला. गेल्या ८ महिन्यांतील वायुदलाच्या हा तिसरा विमान अपघात आहे.

Email Threat : १० लाख डॉलर ‘बिटकॉईन’ न दिल्यास मुंबई विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी !

वारंवार अशा धमक्या येणे म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा जराही धाक राहिला नसल्याचेच द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद !

लाच म्हणून प्रशिक्षण विमाने घेणारे उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक निलंबित !

‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !

Chandigarh Airport Khalistan Zindabad : चंडीगड विमानतळाबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

खलिस्तान्यांची कीड चिरडण्यासाठी राष्ट्रप्रेमी शिखांनी पुढे येणे आवश्यक !

Occasion Of Navy Day : सिंधुदुर्ग विमानतळावर आता रात्रीही विमानसेवा चालू होणार !

४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजर्‍या होणार्‍या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या विमानतळावरून एकाच विमान आस्थापनाकडून केवळ दिवसाची विमानसेवा चालू आहे.

(म्हणे) ‘१९ नोव्हेंबरला विमानातून प्रवास करणार्‍यांच्या जिवाला धोका असेल !’ – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

अमेरिकेत राहून अशा प्रकारच्या धमक्या देऊन प्रसिद्धीत रहाणार्‍या पन्नूला भारताच्या कह्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे का केली जात नाही ?

Pakistan Railway Employees Strike : २ नोव्हेंबर नंतर पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी २ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मासापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. २ नोव्हेंबर या दिवशी वेतन देण्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.