IC-814 Hijack : कंदहार विमान अपहरणाच्‍या वेळी आतंकवाद्यांनी हिंदु प्रवाशांना इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास सांगितले होते !

  • प्रत्‍यक्षदर्शी महिला प्रवाशाने दिली माहिती

  • ‘आयसी ८१४ : द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्‍ये जिहाद्यांची घेण्‍यात आली आहे बाजू !

१९९९ चे कंदहार विमान अपहरण (संग्रहित छायाचित्र)

नवी देहली – वर्ष १९९९ च्‍या कंदहार विमान अपहरणावर आधारित ‘नेटफ्‍लिक्‍स’वरील वेबसिरीज ‘आयसी ८१४ : द कंदहार हायजॅक’मध्‍ये जिहादी आतंकवाद्यांची नावे हिंदु दाखवण्‍यात आली इतकेच समोर येत असले, तरी संपूर्ण वेबसिरीजच भारतविरोधी आणि आतंकवाद्यांची, पाकिस्‍तानची बाजू घेणारी असल्‍याचे आता समोर येत आहे. ‘आतंकवाद्यांनी प्रवाशांना इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास सांगितले होते’, असे  इंडियन एअरलाईन्‍सच्‍या या विमानातील प्रत्‍यक्षदर्शी असणार्‍यांनी माहिती दिली आहे.


या विमानातील एक प्रवासी असणार्‍या पूजा कटारिया यांनी ए.एन्.आय.ला सांगितले की, या विमानात ५ आतंकवादी होते. हे विमान काठमांडूहून देहलीला निघाले होते. उड्डाणाच्‍या अर्ध्‍या घंट्यानंतर आतंकवाद्यांनी विमानाचे अपहरण झाल्‍याची माहिती दिली. अपहरणाची बातमी ऐकून आम्‍ही घाबरलो. आतंकवाद्यांनी आम्‍हाला डोके खाली घालायला सांगितले. आम्‍ही अफगाणिस्‍तानच्‍या कंदहारला कधी पोचलो ते कळलेही नाही. या घटनेमुळे लोकांची प्रकृती खालावली. लोक घाबरले. हे सर्व पाहून बर्गर नावाचा एक अतिरेकी जरा नरमला. त्‍याने लोकांना साहाय्‍य केले. त्‍याने लोकांना अंताक्षरी (एका शब्‍दावरून गाणे गायचे आणि त्‍या गाण्‍याच्‍या शेवटच्‍या अक्षरावरून दुसर्‍या व्‍यक्‍तीने दुसरे गाणे म्‍हणायचे) खेळायला सांगितले. दुसर्‍या आतंकवाद्याने ज्‍याचे नाव ‘डॉक्‍टर’ होते, त्‍याने इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यासाठी अनेक भाषणे दिली. विमानात उपस्‍थित असलेल्‍या इतर २ आतंकवाद्यांना तो ‘भोला’ आणि ‘शंकर’ या नावाने हाक मारत होता. जेव्‍हा विमान अमृतसरला उतरले, तेव्‍हा भारत सरकार कमांडो ऑपरेशन करू शकले असते, जर असे झाले असते तर विमान भारतीय हद्दीबाहेर जाऊ शकले नसते.

संपादकीय भूमिका

अशा राष्‍ट्रद्रोही वेबसिरीजवर बंदी का घालण्‍यात येत नाही ? सरकार अशा प्रकरणात नेहमीच कचखाऊ भूमिका घेत असते, असेच जनतेला वाटते !