चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वांना सामावून घ्या ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप

‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही.

नौदलाच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी विमानतळावरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणारी विमाने उडण्यावर बंदी येण्याची शक्यता

भारतीय सैन्याच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी (गोवा), पुणे आणि श्रीनगर या विमानतळांवरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणार्‍या विमानांच्या उड्डाणावर बंदी येण्याची शक्यता आहे.

चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वरील विमानसेवेचे आरक्षण चालू

जिल्ह्यात चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वर ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे.

चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्‍यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्‍यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

पंजशीरमधील तालिबान्यांच्या ठिकाणांवर अज्ञात लढाऊ विमानांद्वारे आक्रमण

तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.

बाडमेर (राजस्थान) येथे ‘मिग-२१’ लढाऊ विमान कोसळले

उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायदूलाची विमाने ! गेली अनेक दशके हीच स्थिती असतांना त्यात कोणताही सत्ताधारी राजकीय पक्ष पालट करत नाही, हे लज्जास्पद !

चीनने पाकला सदोष ‘जेएफ्-१७’ लढाऊ विमाने देऊन फसवले !

पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !

संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची चाचणी यशस्वी

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.

अफगाणिस्तानच्या कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानकडून रॉकेटद्वारे आक्रमण

तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली.

फिलिपीन्सचे सैनिकी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू

फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.